Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Salaam Bombay Foundation photography program : स्वातंत्र्यदिनी Cityflo आणि Salaam Bombay Foundation यांच्या सहकार्याने १५ विद्यार्थ्यांसाठी खास मुंबई सफारीचे आयोजन करण्यात आले, ज्यातून त्यांनी शहराचा इतिहास, वारसा, संस्कृती आणि आधुनिक ओळख जवळून अनुभवली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 07:08 PM
स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
Follow Us
Follow Us:
  • स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम
  • Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
  • शहराचा इतिहास, वारसा, संस्कृती आणि समकालीन ओळख
मुंबई: या स्वातंत्र्यदिनी, सिटीफ्लो या भारतातील प्रमुख नागरी बस प्रवास सेवा पुरवणाऱ्या कंपनीने सलाम बॉम्बे फाउंडेशन (एसबीएफ) सोबत सहयोगाने सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या १५ विद्यार्थ्यांच्या गटासाठी मुंबईभर एका विशेष शैक्षणिक सफारीचे (टूर) आयोजन केले, जिथे त्यांना एकाच प्रवासात शहराचा इतिहास, वारसा, संस्कृती आणि समकालीन ओळख यांचा अनुभव घेता आला.

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

ही सफारी विद्यार्थ्यांसाठी वर्गाच्या पलीकडे जाऊन मुंबईचा अनुभव घेण्यासाठी आणि शहर व देशाला आकार देणाऱ्या जागांशी व कथांशी जोडले जाण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. सिटीफ्लो बसच्या आरामदायी प्रवासातून विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया, मणी भवन आणि ऑगस्ट क्रांती मैदान, तसेच सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट गॅलरीला भेट दिली आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकाच्या जागेवरूनही प्रवास केला. या प्रवासात पॅराडॉक्स म्युझियमला देखील भेट देण्यात आली, ज्यामुळे या सफारीमध्ये आधुनिक आणि अनुभवात्मक दृष्टिकोन मिळाला.
सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास स्वतःच्या लेन्सद्वारे मुंबई शहराला टिपण्याची एक संधी बनला. विद्यार्थ्यांनी या सफारीदरम्यान प्रमुख ठिकाण, वास्तुकला आणि खास क्षणांचे फोटो कॅप्चर केले, ज्यातून शहराबद्दलचा त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन समोर आला. त्यांनी कॅप्चर केलेले निवडक फोटो सिटीफ्लोच्या प्लॅटफॉर्म्सवरून शहरभर प्रदर्शित केली जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा मुंबईबाबत दृष्टिकोन अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

या उपक्रमामध्ये सिटीफ्लोचे सामायिक व शाश्वत नागरी वाहतुकीवरील लक्ष आणि सलाम बॉम्बे फाउंडेशनचे माध्यम, कला, क्रीडा व व्यावसायिक कौशल्य विकासातील शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुलांना गरीबीच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी सक्षम करण्याचे कार्य एकत्र पाहायला मिळाले. सिटीफ्लो दैनंदिन नागरी प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी आणि सामायिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे, तर सलाम बॉम्बे फाउंडेशन विद्यार्थ्यांना कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देते.

सिटीफ्लोचे सह-संस्थापक, सीएमओ आणि हेड ऑफ सिटीफ्लो कॉर्पोरेट संकल्प केळशीकर म्हणाले, “सिटीफ्लोमध्ये आमचा विश्वास आहे की, शहरामधील वर्दळीचा थेट संबंध ते कसे विकसित होते याच्याशी असतो. अधिक सुलभ, शाश्वत आणि राहण्यायोग्य शहरे उभारण्याची आमची कटिबद्धता केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नाही, तर आम्ही ज्या समुदायांना सेवा देतो त्यांच्या जीवनात मोलाची भर घालणारे अनुभव निर्माण करणे हाही त्यामागील उद्देश आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनसोबत सहयोगामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना त्यांचे शहर अनुभवण्याची, शहराच्या इतिहासाशी जोडले जाण्याची आणि शहराच्या भविष्याची कल्पना करण्याची संधी देता आली. त्यांनी फोटो कॅप्चर करण्याच्या माध्यमातून हा प्रवास टिपताना पाहण्याचा अनुभव अधिक अर्थपूर्ण करणारा ठरला आणि त्यांच्या या दृष्टिकोनाचा मुंबईभर प्रचार केला जात राहिल, अशी आम्हाला आशा आहे.”

सलाम बॉम्बे फाउंडेशनचे कम्युनिकेशन्स प्रमुख सॅविओ पाशाणा म्हणाले, “तरुण पिढीला शोध घेण्याची, निरीक्षण करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा शिक्षण कुठेही घडू शकते. या शैक्षणिक सफारीने आमच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जुडले जाण्याची, तसेच एका आधुनिक दृष्टिकोनातून शहराचे निरीक्षण करण्याची अमूल्य संधी उपलब्ध करून दिली. सिटीफ्लो बसेसमध्ये आपले काम प्रदर्शित केले जाण्याची ही संधी आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण प्लॅटफॉर्म प्रदान करते. आम्हाला शिक्षण, सर्जनशीलता आणि व्यावसायिक संधी एकत्र आणणाऱ्या या स्वातंत्र्यदिन अनुभवाची रचना करण्यासाठी सिटीफ्लोसोबत सहयोग करताना आनंद होत आहे.”हा सहयोग सामायिक विश्वासाला अधोरेखित करतो की, शहरातून प्रवास केल्यानंतर शहराबाबत सर्वोत्तमपणे समजते आणि दैनंदिन प्रवास तरुणांच्या कथा पुन्हा शहरापर्यंत पोहोचवू शकतो.

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

Web Title: Cityflo salaam bombay foundation mumbai educational tour independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Independence Day 2026
  • Mumbai
  • Student

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
1

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
2

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.