Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mankhurd News: मानखुर्दमध्ये मोठी कारवाई! 1200 अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा; मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबईच्या मानखुर्दमध्ये 1200 अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा पडला असुन 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून तिथे 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 08:35 PM
मानखुर्दमध्ये मोठी कारवाई! 1200 अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा (Photo Credit- X)

मानखुर्दमध्ये मोठी कारवाई! 1200 अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मानखुर्दमध्ये मोठी कारवाई!
  • 1200 अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
  • मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई दि.८: मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे सरकारी जमिनीवर असलेल्या अनधिकृत तब्बल बाराशे झोपड्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. या निष्कासित जागेवर आता नागरिकांसाठी ‘विज्ञान पार्क ‘ उभारण्यात येणार आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून त्यातून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पडताळणी करून सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, असे उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

मानखुर्द येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. पोलिस उपायुक्त श्री. समीर शेख ,अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे श्री. पद्माकर रोकडे यांच्यासह पूर्व उपनगरातील अतिक्रमण निष्कासन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह 400 कर्मचाऱ्यांच्या पथकाने या धडक कारवाईत सहभाग घेतला. या मोहिमेव्दारे आतापर्यंत 1200 हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून, 11 एकर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. मोकळ्या केलेल्या जागेवर परत अतिक्रमण होऊ नये या करिता संरक्षक भिंत बांधण्यात येत असून, अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

मुंबई महापालिकेच्या उपनगर अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने केलेल्या कारवाई बाबत मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला अधिक सुरक्षित, सुविधाजनक आणि सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने सह पालकमंत्री या नात्याने कब्जा केलेल्या सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान

मुंबई परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत बांधकामे करून मोकळ्या जागा हडप करण्याचा उद्योग सुरु केला असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यातूनच अनेकदा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ही स्थानिक नेत्यांच्या मदतीने संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा गोरखधंदा तसेच समाजविघातक कृत्याला खतपाणी मिळत असते. मालाड आणि मालवणी परिसरातही सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निदर्शनाला आली असून तिथे ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

अतिक्रमण मुक्त 500 एकर जमिनीवर विधायक उपक्रम राबवणार

मुंबई आणि उपनगर मिळून हजारो एकर सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकामे असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. या सर्व जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पुन्हा त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आणण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी निवडक अतिक्रमण मुक्त 500 एकर जमिनीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात विधायक उपक्रम राबवणार आहोत. मानखुर्द येथील सध्या अतिक्रमण मुक्त करण्यात आलेल्या जमिनीवर नागरिकांसाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने अत्याधुनिक ‘विज्ञान पार्क’ उभारणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

“अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना…”; Mangal Prabhat Lodha यांनी केले स्पष्ट

Web Title: Municipal corporation cracks down on 1200 unauthorized structures in mankhurd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Encroachment Department
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू
1

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू

Mumbai BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट
2

Mumbai BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट

Pankaja Munde: पाऊस आणि वादळामुळे पडलेल्या झाडांबाबत सरकार सतर्क; पंकजा मुंडे यांनी मांडली पुढील योजना; म्हणाल्या…
3

Pankaja Munde: पाऊस आणि वादळामुळे पडलेल्या झाडांबाबत सरकार सतर्क; पंकजा मुंडे यांनी मांडली पुढील योजना; म्हणाल्या…

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
4

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.