Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

Navi Mumbai News : नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खाद्यपदार्थांच्या उत्पादन व एक्सपायरी डेटमध्ये फेरफार केल्याचा पर्दाफाश. गुन्हे शाखेची कारवाई, 75 लाखांचा माल जप्त.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 09:58 PM
नवी मुंबईत खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करून विक्री; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नवी मुंबईत खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करून विक्री; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • तुर्भेतील गोदामावर छापा; डेट प्रिंटिंग मशीन जप्त
  • 75.21 लाखांचा संशयित खाद्यसाठा ताब्यात
  • दोन आरोपींसह 11 निर्यातदार कंपन्यांवर गुन्हा
 

Navi Mumbai News : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर कारवाई सुरू असतानाच नवी मुंबईत खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये फेरफार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी किंवा बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर आणि कमाल किरकोळ किंमत बदलून त्यांची विक्री तसेच निर्यात केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील माहितीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जुन्या तारखांमध्ये बदल करून त्यावर नव्या तारखा छापण्यासाठी डेट प्रिंटिंग मशीनचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही तपासात सहभागी

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही तपासात सहभागी करून घेण्यात आले. सलग सहा दिवस करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल 18 निर्यातदारांच्या सुमारे 2 कोटी 46 लाख 53 हजार रुपयांच्या मालाची पाहणी करण्यात आली. त्यापैकी 11 निर्यातदारांच्या सुमारे 75 लाख 21 हजार रुपयांच्या मालावरील लेबल आणि पॅकेटवरील विविध तपशीलांमध्ये बदल केल्याचे आढळून आले.

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

या कारवाईत उत्पादन तारीख, एक्सपायरी किंवा बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर तसेच MRPमध्ये फेरफार केल्याचे समोर आले. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याबरोबरच अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयप्रकाश संचतीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. संबंधित 11 निर्यातदार कंपन्यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान डेट प्रिंटिंग मशीन, विविध नामांकित कंपन्यांचे खाद्यपदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण 75 लाख 21 हजार 269 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून सुरू आहे. खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने फेरफार करण्यात आला आणि या प्रक्रियेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

Navi Mumbai: तुर्भेतील घनकचरा प्रकल्पात विषारी वायूचा धोका? NMMCने आरोप फेटाळले, जाणून घ्या वस्तुस्थिती

Web Title: Navi mumbai news food expiry date fraud crime branch action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • FDA
  • Navi Mumbai
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
1

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
2

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Twinkle Khanna: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ट्विंकल खन्नावर परिणाम; डिंपल कपाडियासोबत घरातच बनवतेय पनीर
3

Twinkle Khanna: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ट्विंकल खन्नावर परिणाम; डिंपल कपाडियासोबत घरातच बनवतेय पनीर

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त
4

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.