Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही’; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

एफडीएकडे गेल्या तीन महिन्यांत सुमारे १६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, जुलैअखेरपर्यंत तीन हजारांहून अधिक खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. कारवाईत १६५ परवाने निलंबित, तर ७५० हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2026 | 12:40 PM
'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : अन्नाच्या गुणवत्तेला जात, धर्म, व्यवसाय किंवा ठिकाणाची सीमा नसते. त्यामुळे गणेशोत्सवातील महाप्रसाद असो, रस्त्यावरील खाद्यपदार्थ असो किंवा पंचतारांकित हॉटेलमधील जेवण, अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान आहेत. अन्नातील भेसळीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मुंढे यांनी अन्न सुरक्षा, खाद्यतेल, रेस्टॉरंट, शाळांमधील खाद्यपदार्थ, औषध विक्री, रक्तपेढ्या आणि सणासुदीतील खाद्य व्यवसायांबाबत एफडीएची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी नसल्याचे सांगताना हा निर्णय कोणत्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी घेतलेला नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. २०११ पासून यासंदर्भात नियम असून महाराष्ट्राला देण्यात आलेली सवलत २०२० नंतर वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्राच्या नियमांनुसार सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले.

एफडीएकडे गेल्या तीन महिन्यांत सुमारे १६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, जुलैअखेरपर्यंत तीन हजारांहून अधिक खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. कारवाईत १६५ परवाने निलंबित, तर ७५० हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. त्रुटी दूर केल्यानंतर पुनर्तपासणी करून नियमांचे पालन झाल्यास निलंबन उठवले जाते, अन्यथा परवाना रद्द करण्याची कारवाईही होण्याची शक्यता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

रेस्टॉरंट्सकडून नियमांचे पालन

रेस्टॉरंट्सकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचे नूतनीकरण केले जात आहे. काही रेस्टॉरंट्सनी ठराविक कालावधीनंतर स्वतःहून किचन बंद ठेवून स्वच्छता आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

फीडबॅक यंत्रणा उभारण्याचा विचार

खाद्य आस्थापनांमध्ये झुरळे आढळल्यानंतर काही व्यावसायिकांकडून विचित्र कारणे दिली जातात. मात्र, कारणांपेक्षा प्रत्यक्ष पुरावे आणि नियमांचे पालन महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. खाद्यपदार्थांचे रंग आणि दुधाच्या चवीत बदल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे नागरिकांच्या आहे. प्रतिक्रियांसाठी भविष्यात औपचारिक फीडबॅक यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. एफडीएचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही,’ असेही आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले.

FDA Action On Hotels : तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात ! FDA च्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

Web Title: No compromise on food adulteration tukaram mundhe issues a stern warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • FDA Action
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद
1

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
2

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई
3

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
4

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.