Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

Mumbai News: ईशान्य मुंबईतील नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार संजय दिना पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा विकास, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि नागरिकांना सुलभ उपचार मिळावेत यासाठी विविध उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2026 | 06:40 PM
आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

Follow Us
Follow Us:
  • ईशान्य मुंबईच्या आरोग्य सुविधांना मिळणार बळ
  • खासदार संजय दिना पाटील यांची पुढाकाराने नवी योजना
  • ईशान्य मुंबईत दर्जेदार वैद्यकीय सुविधांचा विस्तार
 

नीता परब, मुंबई : ईशान्य मुंबई (Mumbai News) लोकसभा मतदारसंघातील महानगरपालिका रुग्णालये, प्रसूतिगृहे व आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना अधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार संजय दिना पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मुंबईतील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिका मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. नागरिकांना वेळेवर आणि चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

रुग्णालयात मिळणार आवश्यक सोयी सुविधा

गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच ५०० खाटांच्या विस्तार सेवा केंद्राचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करून ते रुग्णसेवेसाठी सुरू करण्याची मागणी आपल्या निवेदनात केली आहे. तसेच शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी आणि रुग्णालयाच्या आरोग्य सेवा महानगरपालिकेच्या माध्यमातूनच अधिक सक्षमपणे सुरू ठेवाव्यात, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

– देवनार महानगरपालिका प्रसूतिगृह व आरोग्य केंद्रात डॉक्टर, निवासी डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ, नवजात शिशू अतिदक्षता सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

– विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात नवजात बालकांसाठी ह्युमन मिल्क बँक सुरू करण्याची मागणीही करण्यात आली केली.
–
– भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले मॅटर्निटी होमच्या पुनर्बांधणीचे प्रलंबित काम पुन्हा सुरू करण्याबरोबरच सुषमा स्वराज मॅटर्निटी होम व आरोग्य केंद्रात आवश्यक डॉक्टर, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, नवजात शिशू अतिदक्षता सुविधा आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.

– मुलुंड येथील श्यामकुंवरबाई जटाशंकर डोसा चाचणी मुलुंड मॅटर्निटी होममध्येही आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.

– मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात उपलब्ध जागेचा पूर्ण क्षमतेने वापर करून एमआरआय, सीटी स्कॅन, डायलिसिस सेंटर, एनआयसीयू, प्रसूतिगृह आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सुरू कराव्यात, तसेच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

– मुलुंड येथील ईएसआयएस रुग्णालयाच्या उपलब्ध जागेचा योग्य वापर करून तेथेही आवश्यक वैद्यकीय सुविधा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

याशिवाय पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथिक तसेच इतर आयुष पद्धतीच्या तज्ज्ञांची उपलब्धता वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळावे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही खासदार संजय दिना पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. ईशान्य मुंबईतील पालिका व शासकीय रुग्णालयांमधील प्रलंबित विकासकामांना गती मिळून नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासन व मुंबई महानगरपालिका स्तरावर आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस महापौर रितू तावडे, उपमहापौर, खासदार ज्योती वाघमारे, रविंद्र वायकर, मुंबईतील विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Northeast mumbai residents get quality healthcare facilities sanjay dina patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
3

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
4

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.