Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’चे पाडकाम! वरळी-शिवडी उन्नत रोड, प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार

प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’ इमारतीचे पाडकाम करण्यात आले असून, त्यामुळे वरळी-शिवडी उन्नत मार्ग आणि दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार आहे. लवकरच हाजी नुरानी इमारतही रिकामी करून घेत तिचेही पाडकाम केले जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2026 | 11:23 AM
प्रभादेवीतील 'लक्ष्मी निवास'चे पाडकाम! वरळी-शिवडी उन्नत रोड, प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार

प्रभादेवीतील 'लक्ष्मी निवास'चे पाडकाम! वरळी-शिवडी उन्नत रोड, प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’चे पाडकाम
  • वरळी-शिवडी उन्नत रोड
  • प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार
मुंबई : वरळी-शिवडी एलिव्हेटेड रोडच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार असून, आता या कामात अडथळा ठरत असणाऱ्या इमारतींचे पाडकाम सुरुवात करण्यास करण्यात आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीतील रहिवाशांना घरे वितरित केल्यानंतर पाडकाम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. आता या इमारतीचे ९० कोटी रुपये एमएमआरडीएने म्हाडाला दिले. लवकरच हाजी नुरानी इमारतही रिकामी करून घेत तिचेही पाडकाम केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार आहे.

Maharashtra IAS Transfers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काय आहे अशोक खरात कनेक्शन?

दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद जाण्यासाठी वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधला जात आहे. या उन्नत रस्ता आतापर्यंत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्रकल्पास विलंब झाला आहे. आता मात्र हा रस्ता सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार एमएमआरडीएनेही आपल्या भागातील कामाला वेग दिला आहे. महारेलच्या हद्दीतील कामालाही वेग देण्याचा महारेलला आदेश एमएमआरडीएने दिला आहे.

हाजी नुरानी इमारत रिकामी करणे बाकी

हाजी नुरानी इमारतीतील काही रहिवाशांची घरे रिकामी करून घेणे बाकी आहे. ही इमारतही लवकरच रिकामी करून घेण्यात येणार असून त्यानंतर तिचे पाडकाम सुरू केले जाणार आहे. या दोन्ही इमारतीचा प्रश्न सुटल्याने आता प्रभादेवी दुमजली पुलांच्या पर्यायाने उन्नत रस्त्याव्या कामाला वेग येईल, असेही मुखर्जी यानी सांगितले.

इमारतीतील ७८ रहिवाशांसाठी एमएमआरडीएने म्हाडाची ७८ घरे घेतली आहेत. यासाठी एमएमआरडीएने म्हाडाना ९० कोटी रुपये दिले आहेत. ही घरे एमएमआरडीएकडे वर्ग झाल्यानतर घराचे वितरण सुरू करण्यात आले असून, लक्ष्मी निवासमधील सर्व रहिवाशांना घरे वितरित करण्यात आली आहेत. तर ही इमारत पूर्णतः रिकामी झाल्याने शुक्रवात्पासून वा इमारतीच्या पाडकामास सुरुवात करण्यात करण्यात आली, अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

महारेलच्या हद्दीतील काम संथगतीने

महारेलच्या हद्दीतील काम संथगतीने सुरू असून त्यांना वेग वाढविण्याचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करून उन्नत रस्ता सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आता भूसंपादनाचा अडथळा दूर झाला असून आता कामाला वेग येतो का आणि सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दुमजली पुलाच्या भूसंपादनाचा अडसर दूर

उन्नत रस्ता प्रकल्पामधील प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामातील भूसंपादनाचा अडसरही दूर झाला आहे. या पुलाच्या कामासाठी प्रभादेवी येथील लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी इमारतीचे विस्थापन करावे लागत आहे. मात्र या इमारतीतील रहिवाशांनी विस्थापनास विरोध केला होता. तिथल्या तिथे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन केले होते. जुन्या प्रभादेवी पुलाच्या पाडकामादरम्यान रस्त्यावर उतरून आंदोलनाही केले होते. रहिवाशांच्या विरोधामुळे पुनर्वसनाचा मुद्दा गंभीर बनला होता आणि त्याचा कामावर परिणाम होत होता. पण अखेर आता एमएमआरडीएला हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचा मोठा उपक्रम; ACTRECमध्ये ७८४ जणांसाठी निवास, कर्करोग क्षेत्रातील मनुष्यबळ बळकट होणार

Web Title: Prabhadevi laxmi nivas demolition worli sewri elevated road double decker bridge work speed up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra 1st Conclave: जागतिक गुंतवणूक आणि विकासावर मंथन; 19 मे रोजी मुंबईत दिग्गजांचा महासंगम
1

Maharashtra 1st Conclave: जागतिक गुंतवणूक आणि विकासावर मंथन; 19 मे रोजी मुंबईत दिग्गजांचा महासंगम

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?
2

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

Mumbai Crime: माणुसकीला काळिमा! २००० रुपयांच्या भाड्यासाठी पत्नी-मुलीचा सौदा; नराधम पती आणि घरमालक अटकेत
3

Mumbai Crime: माणुसकीला काळिमा! २००० रुपयांच्या भाड्यासाठी पत्नी-मुलीचा सौदा; नराधम पती आणि घरमालक अटकेत

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान
4

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.