Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?

महायुतीचा महापौर निश्चित असला तरी भाजप की शिंदेसेना, यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. कमी जागा लढवून जास्त विजय मिळाल्यामुळे महापौरपदासाठी भाजप स्ट्राइक रेटचा मुद्दा पुढे करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 18, 2026 | 02:59 PM
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'

Follow Us
Follow Us:
  • शिवसेनेला ६८ तर भाजपाला केवळ ५४ जागा
  • फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस रवींद्र चव्हाणांनी स्वबळाचा आग्रह बाजूला सारला
ठाणे: महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करणाऱ्या भाजपाला कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद हवे असून त्या दृष्टीने भाजपा आणि शिंदेसेनेनेही पडद्याआडून हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीचा महापौर होणार, हे जरी निश्चित असले तरी महायुतीत नेमका कोणाचा महापौर होणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. कल्याण-डोंबिवलीतील १२२ जागांपैकी युती केल्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला ६८ तर भाजपाला केवळ ५४ जागा देण्यात आल्या होत्या. प्रारंभी रवींद्र चव्हाण हे शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती न करता स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करत होते.

Raigad News: कर्जत-खालापूरात राजकीय उलथापालथ! परिवर्तन आघाडीने मारली बाजी, अजित पवार–ठाकरे गट एकत्र

मख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने स्वबळाचा आग्रह सोडला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस रवींद्र चव्हाण यांना स्वबळाचा आग्रह बाजूला सारत शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करून निवडणूक लढवावी लागली, भाजपामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमुळे मोठी नाराजी उफाळून आली होती. तथापि, रवींद्र चव्हाण यांनी सर्वांची समजूत काढली. निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने ५४ जागा लढवून घसघशीत तब्बल ५० जागांची कमाई केली. तर, शिंदे याच्या शिवसेनेने भाजपापेक्षा अधिक अशा ६८ जागा लढवल्या तथापि शिंदे सेनेला भाजपापेक्षा केवळ दोनच अधिक जागा म्हणजे ५२ जागांवर विजय मिळवता आला, त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीत भाजपाचा स्ट्राइक रेट हा शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे. महापौर पदाचा निकष अधिक जागा न धरता स्ट्राईक रेट ठरवावा, असा आता भाजपा नेत्यांचा आग्रह आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ठाकरे सेनेचे मधुर म्हात्रे शिंदेंच्या भेटीला

कल्याण पूर्वमधून उद्धव ठाकरे याच्या मशाल निशाणीवर निवडणूक लढवून जिंकून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत.

मंदारी यांनी घेतली गायकवाडांची भेट

६८ शिंदे यांच्या शिवसेनेला कल्याण-डोंबिवलीतील १२२ जागापैकी कल्याण पूर्वेतून निवडून आलेल्या मनसेच्या कल्याण पूर्वेतून निवडून आलेल्या मनसेच्या नगरसेविका शितल मंदारी यांनी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शितल मंदारी यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तथापि युतीच्या जागावाटपामुळे त्यांना उमेदवारी देणे भाजपला शक्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी मनसे प्रवेश करून मनसेतर्फे निवडणूक लढवली आणि जिंकून आल्या. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेने नगरसेवकांची जमवाजमव सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

BMC Mayor: ‘खाई त्याला खवखवे’, शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना पंचतारांकित ‘कारावासात’ ठेवणार एकनाथ शिंदे, महापौर होईपर्यंत चक्क…

पुढील आठवड्यात आरक्षण सोडत

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर झाला असला तरी अद्याप राज्य सरकारने महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण सोडती द्वारे निश्चित केलेले नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात नगर विकास खात्यातर्फे मंत्रालयात महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर आठच दिवसात राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत.

Web Title: Race for kalyan dombivli mayor heats up parties lock horns over mayors chair mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार! शहरात उभारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
1

कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार! शहरात उभारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
2

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
4

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.