Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री रास्ता रोको आंदोलन केलं.

  • By विवेक
Updated On: Oct 07, 2026 | 04:00 PM
Rahul Gandhi Detained Mumbai Congress protest

Rahul Gandhi Detained Mumbai Congress protest

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबईत युवक काँग्रेसचा रास्ता रोको
  • वांद्रे रिक्लेमेशनवर मोदी सरकार आणि ज्ञानेश कुमारांविरोधात जोरदार घोषणाबाजी
  • महिला कार्यकर्त्यांशी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा युवक काँग्रेसचा आरोप
 

दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेटीसाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील अन्य नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक झाली. मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. रात्री सुमारे ११ वाजता कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. यावेळी मोदी सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता याबाबत युवक काँग्रेसने सवाल उपस्थित केला. राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना ताब्यात घेतल्याची घटना म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

INDIA Alliance Delhi Protest: दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस तेजस चंदूरकर, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा ढवळे, अजय मिश्रा, शादाब अन्सारी, शिवा यादव, अब्दुल समद, पंकज चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘राहुलजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरू’

यावेळी बोलताना झीनत शबरीन यांनी केंद्रातील आणि विविध राज्यांतील भाजप सरकारांवर गंभीर आरोप केले. ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर देशभरात संताप आहे, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी हे सुमारे ३०० खासदारांसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप शबरीन यांनी केला. ही मोदी सरकारची दडपशाही असल्याचं त्या म्हणाल्या.

‘मोदी सरकार जेव्हा-जेव्हा राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा-तेव्हा राहुलजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून संघर्ष करू,’ असा इशाराही त्यांनी दिला.

महिला कार्यकर्त्यांशी धक्काबुक्कीचा आरोप

दरम्यान, मुंबईतील आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी महिला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. काही महिला कार्यकर्त्यांना केसाला धरून ओढत पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला.

पोलिसांच्या या कथित दडपशाहीचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन

Web Title: Rahul gandhi detained youth congress rasta roko bandra reclamation mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Congress
  • election commission of india
  • Gyanesh Kumar
  • Mumbai News
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना
1

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना

CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन
2

CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

मुंबई-एमएमआरची कनेक्टिव्हिटी बदलणार; १० रिंग रोडच्या मास्टर प्लानचे अनावरण, आता प्रवास अधिक सुलभ होणार
4

मुंबई-एमएमआरची कनेक्टिव्हिटी बदलणार; १० रिंग रोडच्या मास्टर प्लानचे अनावरण, आता प्रवास अधिक सुलभ होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.