Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच

लोकसभेत रेल्वेसंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देताना प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि भविष्यातील प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे देशातील रेल्वे व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 12:43 PM
रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच

रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे सेवेत प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.
  • सुरक्षित आणि आधुनिक प्रवासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे.
  • देशभरात रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत.
मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी केंद्र सरकार दरवर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे अनुदान देत असून त्यामुळे लोकलचे तिकीट दर नियंत्रणात राहून सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात प्रवास करणे शक्य होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी २३८ स्वयंचलित दरवाजांच्या नव्या उपनगरीय लोकल गाड्या लवकरच सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मंगळवारी (ता. १७) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा एल्गार! जरांगे पाटलांची पुन्हा ‘चलो मुंबई’ची हाक; आंदोलनाचा नवा इशारा

मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन २३८ नवीन उपनगरीय लोकल गाड्यांची निर्मिती सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार असून गाडी सुरू असताना दरवाजे बंद राहतील, अशी यंत्रणा असणार आहे. त्यामुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणे आणि पडण्याच्या घटना कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय या गाड्यांमध्ये सुधारित वायुवीजन व्यवस्था, आधुनिक ब्रेक प्रणाली तसेच प्रवाशांच्या सोयीच्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तसेच मुंबई, पुण्यासह देशातील ४८ शहरांमध्ये रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी विविध कामे सुरू असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये नवीन फलाट, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स, कोचिंग टर्मिनल्स आणि देखभाल सुविधा उभारल्या जात आहेत. या कामांमुळे भविष्यात अधिक गाड्या चालवणे शक्य होणार असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

स्थानकांचे आधुनिकीकरण सुरूच

देशभरातील १३०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू असून त्यापैकी १८० स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तर सुमारे ५०० स्थानके अंतिम टप्प्यात आहेत. या कामांतर्गत प्रवाशांसाठी आधुनिक प्रतीक्षालय, एस्कलेटर, लिफ्ट, स्वच्छता सुविधा आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित केल्या जात आहेत, तसेच ७५ स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी थांबू शकतील असे आधुनिक ‘होल्डिंग एरिया’ उभारले जात आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई-पुणे आणखी जवळ येणार

मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली. तसेच पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवास सुमारे दोन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे काम सुरू असून एकूण २१ किलोमीटर लांबीच्या सात बोगद्यांपैकी सुमारे ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही टप्प्याटप्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा एल्गार! जरांगे पाटलांची पुन्हा ‘चलो मुंबई’ची हाक; आंदोलनाचा नवा इशारा

नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वेची तयारी

आगामी नाशिक कुंभमेळा लक्षात घेऊन रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन १७ रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि १९ भुयारी मार्गांची कामे सुरू आहेत. यामुळे कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Railway big plan mumbai local 3000 crore support automatic door trains coming soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Local Trains
  • Mumbai News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
2

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
3

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.