Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: परदेशी पर्यटकांच्या व्हिडीओचा इम्पॅक्ट! वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणांवर रेल्वेचा हातोडा

वांद्रे रेल्वे स्थानकातील कचरा आणि अतिक्रमणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने 65 झोपड्या हटवल्या. विदेशी पर्यटकांनी मुंबईतील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 04:23 PM
वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणांवर रेल्वेचा हातोडा

वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणांवर रेल्वेचा हातोडा

Follow Us
Follow Us:

 

  • विदेशी पर्यटकांच्या व्हिडीओचा दणका!
  • वांद्रे रेल्वे स्थानकातील 65 अनधिकृत झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा
  • ‘गरीब नगर’मध्ये मोठी कारवाई
Bandra Railway Station Encroachment Action: वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील कचरा आणि रेल्वे रुळांलगत उभारलेल्या अतिक्रमणांचे व्हिडिओ काही विदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या प्रश्नाची मोठी चर्चा सुरू झाली होती. या व्हिडिओंची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलत वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या मोहिमेत रेल्वे हद्दीतील सुमारे 65 अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे हटविण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता.17 मार्च) करण्यात आली. सांताक्रूझ येथील वरिष्ठ विभाग अभियंता (जमीन) कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली.

धडक कारवाई कायम ठेवण्याचा निर्धार

रेल्वे मार्गालगत वाढणारी अतिक्रमणे आणि परिसरात साचणारा कचरा यामुळे रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईसाठी पाच जेसीबी, दोन ट्रक आणि सुमारे 38 कामगारांची मदत घेण्यात आली. तसेच रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पाडकामानंतर निर्माण झालेला मलबा रेल्वे हद्दीबाहेर हलविण्यात आला. कारवाईदरम्यान कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून वैद्यकीय पथकासह एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात होती.

जुनी वाहनं वापरणं आता महाग होणार; वाहनांवर दुपटीने केली गेली करवाढ

नियमित पाहणी सुरू

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, वांद्रे परिसरात नव्याने होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी नियमित पाहणी केली जाणार आहे. अनधिकृत झोपड्या किंवा बांधकामे आढळल्यास तात्काळ पाडकामाची कारवाई केली जाईल. तसेच रेल्वे रुळांलगत कचरा साचू नये यासाठी स्थानिक महानगरपालिका आणि पोलिसांशी समन्वय ठेवून उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वेची जमीन अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

काय होता व्हिडीओ..?

विदेशी पर्यटकांनी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये रुळांजवळ साचलेला कचरा, रेल्वे रुळांच्या अगदी जवळ उभारलेल्या झोपड्यांची दृश्ये दिसत होती. एका पर्यटकाने व्हिडिओमध्ये “हे रेल्वे स्टेशन आहे की कचराकुंडी..? असा प्रश्न उपस्थित करत परिसरातील स्वच्छतेबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली.

“इलेक्ट्रिक बस बैठक फुसका बार, मंत्र्यांच्या निर्देशाचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही”, एसटी कर्मचारी काँग्रेसची टीका

Web Title: Railway cracks down on encroachments at bandra railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Bandra
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.