Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेचा दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक, प्रवाशांची रात्र स्टेशनवर

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ३४४ लोकल सेवा रद्द झाल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला आहे. 

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2025 | 08:49 AM
local (फोटो सौजन्य- pinterest)

local (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Follow Us:

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ३४४ लोकल सेवा रद्द झाल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला आहे.  शुक्रवार रात्रीपासून सुरु झालेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना रात्र स्टेशनवर काढावी लागली. तसेच सकाळी रेल्वे स्थानकावर आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. मेगा ब्लॉकमुळे अंधेरी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली.

एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो प्रवास, महिन्याभरात मुंबई वन कार्ड सेवेत

विरारवरुन फक्त अंधेरीपर्यंत लोकल

विरारवरुन सकाळच्या वेळेत सर्वच लोकल अंधेरीपर्यंत सोडण्यात आल्या. अंधेरीच्या पुढे मेगाब्लॉक सुरू असल्याने सर्व लोकल बंद होत्या. या मेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका बसला.   रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणतीही सुविधा दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत होता. रात्री आलेल्या प्रवाशांना जेवण मिळाले नसल्याने प्लॅटफॉर्मवर उपाशीच झोपावे लागले.

मेगाब्लॉक का घेण्यात आला?

पश्चिम रेल्वेने दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. माहीम ते बांद्रा स्तनाकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे शुक्रवारी अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:०० ते सकाळी ८:३० पर्यंत गाड्या धावल्या नाहीत. अप डाऊन जलद मार्गावर रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत लोकल सेवा बंद होती. यावेळी चर्चगेट स्थानकातून रात्री १०:२३ सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

आज शनिवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक होता. अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत लोकल सेवा बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये पोहोचणे अवघड झाले आहे. अप जलद मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ८:०० वाजपर्यंत लोकल सेवा बंद होती. या काळात चर्चगेट, दादर दरम्यान जलद लोकल बंद होत्या. तसेच डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.

Web Title: Railways jumbo mega block for two days passengers spend night at stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • Megablock
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.