Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Mira Bhayandar News: फेरीवाला समितीला कोणतीही माहिती न देता बाजार फी वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडून फेरीवाल्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराला ओळखपत्र वाटपाचा अधिकार नेमका कोणी दिला, असा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणाची दखल घेत बाजार विभागाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 11:17 AM
फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Follow Us
Follow Us:
  • बाजार फी वसुली करणारा ठेकेदारच वाटतोय फेरीवाल्यांना ओळखपत्रे
  • बाजार विभागाने बजावली कारणे दाखवा नोटीस
  • फेरीवाला समितीला डावलून ओळखपत्रांचे वाटप
  • ठेकेदाराच्या कारभारामुळे बाजार विभागाची धावपळ
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या फेरीवाला (Hawker ID Card) व्यवस्थापनात पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेने अधिकृतपणे शहर फेरीवाला समिती स्थापन केलेली असताना, या समितीला कोणतीही माहिती न देता बाजार फी वसुलीचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून फेरीवाल्यांना ओळखपत्रांचे वाटप सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे फेरीवाला ओळखपत्र तयार करणे अथवा वाटप करणे ही जबाबदारी बाजार फी वसुली करणाऱ्या ठेकेदाराची आहे का, आणि त्याला हा अधिकार नेमका कोणी दिला, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. (Mira Bhayandar News)

या प्रकाराची माहिती फेरीवाला समितीचे सदस्य ओमप्रकाश गाडोदिया यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत फेरीवाला विभागाकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर सोमवारी फेरीवाला समितीच्या सदस्यांनी महापालिकेच्या फेरीवाला विभागाची भेट घेत संबंधित ओळखपत्रांच्या वाटपावर तीव्र आक्षेप घेतला. समितीच्या आक्षेपानंतर फेरीवाला विभागाने बाजार विभागाला संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले आहे.

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम

समितीला माहितीच नाही; मग ओळखपत्रे तयार कोणी केली?

महापालिकेच्या फेरीवाला समितीचे अध्यक्ष स्वतः आयुक्त राधाबिनोद शर्मा आहेत. अशा परिस्थितीत समितीला विश्वासात न घेता फेरीवाल्यांशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया परस्परपणे राबविली गेल्याचा आरोप समिती सदस्यांकडून करण्यात आला आहे. बाजार विभागाकडे फेरीवाल्यांकडून बाजार फी वसूल करण्याची जबाबदारी असताना, त्याच विभागाच्या माध्यमातून बाजार फी वसूल करणाऱ्या ठेकेदाराला फेरीवाला ओळखपत्र वाटपाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भातील आदेश लेखी स्वरूपात आहेत का? असल्यास ते कोणी दिले? ओळखपत्रांची छपाई कोणाच्या परवानगीने करण्यात आली? त्याचा खर्च कोणी केला? आणि वाटपासाठी ठेकेदाराला अधिकार कोणी दिला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

८,५२८ पात्र फेरीवाल्यांचे काय?

महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील ८ हजार ५२८ फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत किती फेरीवाल्यांना ओळखपत्रे वाटली, किती ओळखपत्रे छापण्यात आली आणि या प्रक्रियेत फेरीवाल्यांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम घेण्यात आली का, याची चौकशी करण्याची मागणी समिती सदस्यांकडून करण्यात आली आहे. ओळखपत्र वाटपाच्या नावाखाली फेरीवाल्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी किंवा चर्चा असल्यास त्याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचे समिती सदस्यांचे म्हणणे आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

‘ठेकेदाराला अधिकार कोणी दिला?’

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाजार फी वसुलीचा ठेका घेतलेल्या कंपनीला फेरीवाला ओळखपत्र छापणे आणि त्याचे वितरण करण्याचा अधिकार नेमका कोणत्या आदेशाने देण्यात आला? समिती सदस्यांच्या म्हणण्यानुसार, ओळखपत्रांची छपाई सुरू करण्यापूर्वी फेरीवाला समितीला माहिती देण्यात आली नाही. फेरीवाला विभागालाही या प्रक्रियेची पूर्वकल्पना नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनातील विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे की जाणीवपूर्वक प्रक्रिया बाजूला ठेवण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठेकेदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

बाजार फी वसुलीचा ठेका अंधेरी येथील मेसर्स ओडीएस प्रोटेक्टिव्ह सर्विसेस प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला असल्याचे सांगितले जाते. या ठेकेदाराच्या कामकाजाबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा समिती सदस्यांकडून करण्यात आला आहे. ठेका, वसुलीची पद्धत आणि मुदत याबाबतही काही आक्षेप असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर बाजार फी वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडे फेरीवाला ओळखपत्र वाटपाची अतिरिक्त जबाबदारी कशी आली, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

‘ओळखपत्र वाटप घोटाळ्याची चौकशी करा’

फेरीवाला समिती सदस्य ओमप्रकाश गाडोदिया यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ओळखपत्रांची छपाई, वितरण, संबंधित आदेश, ठेकेदाराला देण्यात आलेले अधिकार तसेच फेरीवाल्यांकडून संभाव्य आर्थिक वसुली या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, फेरीवाला विभागाच्या निर्देशानंतर बाजार विभागाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे का, की केवळ नोटीस बजावून प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न होणार, याकडे फेरीवाला समितीचे लक्ष लागले आहे.

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, पात्रता, ओळखपत्रे आणि बाजार फी यासारख्या संवेदनशील विषयात पारदर्शकता अत्यावश्यक असताना, अधिकृत समितीला माहिती न देता ओळखपत्र वाटप सुरू झाल्याचा आरोप गंभीर आहे. त्यामुळे ओळखपत्रे कोणी छापली, कोणाच्या आदेशाने छापली, ठेकेदाराला अधिकार कोणी दिला आणि आतापर्यंत किती फेरीवाल्यांना ती वितरित झाली, याचा संपूर्ण तपशील प्रशासन जाहीर करणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

महापालिका आयुक्त तथा फेरीवाला समितीचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, की या प्रकरणावरही पडदा टाकला जाणार, याकडे आता फेरीवाला समिती तसेच शहरातील हजारो फेरीवाल्यांचे लक्ष लागले आहे.

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

Web Title: Hawker id card distribution contractor market fee collection show cause notice sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • Mumbai

संबंधित बातम्या

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
1

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
3

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
4

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.