Raj Thackeray News: मनसे आणि प्ररप्रांतीयांचे वैर हा काही नवा मुद्दा नाही. गेल्या महिन्यात मराठी- हिंदी चा वाद उफाळल्यानंतर मनसे चांगलीच चर्चेत आली होती. मराठी शाळेत हिंदी भाषेची सक्ती करण्याला मनसेचा जोरदार विरोध केला. यावरून राजकारणही चांगलंच तापलं होते. हा वाद काहीसा थंड झाला असताना आता मुंबईत एका परप्रांतीय तरूणाने मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. सुजित दुबे असे या परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्वेत राहणाऱ्या परप्रांतीय तरूणाने राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. दारुच्या नशेत या तरूणाने राज ठाकरे यांना आई-बहीणीवरून अगदी घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. दारूच्या नशेत राज ठाकरेंना आई-बहिणीवर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवीगाळ कऱणारा हा तरूण अंधेरी पूर्वेत राहणारा असल्याचे समोर आले. त्यानतंर मनसे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले असून त्या परप्रांतीयाला धडा शिकवणार असल्याचा त्यांनी इशाराही दिला आहे.
Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट
दरम्यान, राज ठाकरेंवर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधेरीत मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले होते. व्हायरल व्हिडीओच्या दखल घेत, एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ परप्रांतीय सुजित दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, आरोपीच्या तीन अनधिकृत धंद्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जर पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नाही, तर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना भेटून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच आरोपीचे तीन अनाधिकृत व्यवसायावर देखील कारवाई करण्याची मागणी मनसेकडून पोलिसांना करण्यात आली आहे. “जर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, तर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केले जाईल.” असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत
नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी नागरिकांमध्ये वाद घडल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकत असलेल्याने एका गाडीला धडक दिल्यानंतर अरेरावी केल्याचा आरोप आहे. आरोपीने “मराठी लोग की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो” अशी शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आरोपीला मराठी बोलण्याचा आग्रह धरला, पण त्याने नकार दिल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चोप दिला. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवला गेला नसला तरी, गाडीला दिलेल्या धडकविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.