Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना आणि चेंबूर येथील झाड कोसळून झालेल्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 09:19 PM
Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
Follow Us
Follow Us:
  • मुंबईत निष्काळजीपणामुळे २ बळी!
  • साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
  • शिवसेनेची BMC कडे मागणी
मुंबई: साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा झालेला मृत्यू आणि चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनांप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, उपमहापौर संजय घाडी, बालकल्याण समितीच्या मिनल तुर्डे आणि किरण लांडगे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २ जुलै २०२६ रोजी साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात मॅनहोलच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना असलम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वीही के/पश्चिम विभागात मान्सूनपूर्व पाहणीदरम्यान तुटलेल्या मॅनहोलच्या झाकणामुळे पालिकेच्याच कर्मचाऱ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर १५ जून २०२६ रोजी शहरातील विशेषतः शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि पाणी साचणाऱ्या भागांतील मॅनहोलचे सर्वेक्षण करून सुरक्षित संरक्षक जाळ्या बसविण्याबाबत प्रशासनाला लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

याशिवाय, चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळे चार विद्यार्थी जखमी झाले आणि ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. धोकादायक झाडांची वेळेत छाटणी व नियमित पाहणी करण्यात झालेल्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या दोन्ही घटना प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.

माझा प्रभाग माझी जबाबदारी, सर्व झाडांचं ऑडिट सुरू, नगरसेविका संध्या दोशी यांनी दिली माहिती

Web Title: Register a case of culpable homicide against those responsible for the sakinaka and chembur tragedies shiv sena demands of the bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • BMC
  • Mumbai accident
  • Mumbai Rain
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
2

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
3

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.