Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ritu Tawde : मारहाण प्रकरण महापौरांना भोवणार! शाळेतील वादाच्या खटल्यातून निर्दोष मुक्ततेस न्यायालयाचा नकार

'शिक्षक मारहाण' प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे महापौरांच्या विरोधातील फौजदारी खटला आता नियमितपणे सुरूच राहणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 19, 2026 | 12:49 PM
मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार! महापौरांचे जुन्या विहिरी आणि तलाव पुनरुज्जीवित करण्याचे आदेश (Photo Credit- X)

मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार! महापौरांचे जुन्या विहिरी आणि तलाव पुनरुज्जीवित करण्याचे आदेश (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मारहाण प्रकरण महापौरांना भोवणार
  • शाळेतील वादाच्या खटल्यातून निर्दोष मुक्ततेस न्यायालयाचा नकार
  • रितू तावडे यांच्यासह इतर सहा जणांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी हुज्जत घातली
मुंबई: २०१६ मधील बहुचर्चित ‘शिक्षक मारहाण’ प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे महापौरांच्या विरोधातील फौजदारी खटला आता नियमितपणे सुरूच राहणार असून, त्यांना न्यायालयाच्या फेऱ्यांमधून तूतांस दिलासा मिळालेला नाही. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१६ सालातील हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. सांताक्रूझ येथील एका उर्दू शाळेतील कॅन्सरग्रस्त शिक्षकाच्या बदलीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादात रितू तावडे यांच्यासह इतर सहा जणांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी हुज्जत घातली होती.

खटला सुरू राहणार

आरोपानुसार, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रितू तावडे यांनी दोन शिक्षकांच्या कानशिलात लगावली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यमान महापौर रितू तावडे यांनी स्वतःला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. ही घटना २९ जुलै २०१६ रोजी वाकोला भागातील एका महापालिकेच्या उर्दू-माध्यमाच्या शाळेत घडली होती, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका महिला शिक्षिकेच्या अचानक बदलीवरून हा वाद सुरू झाल्याचा आरोप आहे. फिर्यादी पक्षाने म्हटले आहे की, तावडे यांनी इतर सहा जणांसह शाळेत प्रवेश केला आणि शिक्षिकेच्या बदलीवरून व्यवस्थापनाशी जोरदार वाद घातला, तसेच दोन शिक्षकांना मारहाणही केली. पीडितांच्या जबानीच्या आधारे, या प्रकरणात महापौरांवर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे आढळले आहेत, असे न्यायालयाने म्हटले.

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, थेट विधानपरिषदेतच मुद्दा गाजला; गृहराज्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन

महापौरांचा दावा काय ?

महापौर तावडे यांनी याचिकेत असा दावा केला की, ‘घटनास्थळी त्यांची उपस्थिती योगायोगाची होती आणि या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यांनी म्हटले की, तक्रारदाराने (शाळेच्या मुख्याध्यापिकेने) अवाजवी प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाजपचे नगरसेवक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर केला.’ अर्जदाराची राजकीय ओळख कळल्यावर, तक्रारदाराने द्वेषपूर्ण हेतूने आणि छुप्या उद्देशाने कृती केली आणि आपली वैयक्तिक तक्रार बळकट करण्यासाठी अर्जदाराला या प्रकरणात खोटे गोवले, असे महापौर म्हणाल्या.

पोलिसांच्या वकिलांचे म्हणणे काय?

पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सरकारी वकील इक्बाल सोळकर यांनी युक्तिवाद केला की, पीडितांच्या जबाबावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, तावडे यानी दोन शिक्षकांना कानशिलात लगावली होती. फिर्यादी पक्षाने युक्तिवाद केला की शाळा है असे ठिकाण आहे. जिथे विद्यार्थी जीवनातील धडे शिकतात, परंतु हाणामारी तिथे घडल्यामुळे या कृत्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, प्रकरणातील तथ्यांचा विचार करून न्यायाधीश म्हणाले, पीडितांनी अर्जदाराचे नाव स्पष्टपणे घेतले आहे, ज्याने शाळेत त्यांच्यावर हल्ला केला होता’.

रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच

Web Title: Ritu tawade assault case session court rejects discharge plea news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.