Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन

मुलगा शर्मदने दहावीच्या परीक्षेत ९२.०४ टक्के गुण मिळवत संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले, पण हा आनंद साजरा करत असतानाच आई साक्षी सोनावणे यांचे अचानक निधन झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 13, 2026 | 06:01 PM
मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन

मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन

Follow Us
Follow Us:
  • मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला!
  • अवयवदानातून सात जणांना जीवनदान
  • आई साक्षी सोनावणे यांचे अचानक निधन
राम खांदारे, मुंबई : मुलगा शर्मदने दहावीच्या परीक्षेत ९२.०४ टक्के गुण मिळवत संस्कृत विषयात पैकीच्या पैकी १०० गुण मिळवले. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र आई साक्षी शिरीष सोनावणे या आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ऑफिसमधूनच शेअर करत होत्या. मात्र काही मिनिटांतच काळाने घाला घातला आणि त्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा करू शकल्या नाहीत. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळाले. यावेळी हृदय, यकृत, फुफुस, मूत्रपिंड, डोळे आणि ऊती दान करण्यात आले.

पूर्वाश्रमीच्या दीपज्योती पालशेतकर असलेल्या साक्षी सोनावणे या फार्मा कंपनीत कार्यरत होत्या. एमएससी ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतल्यामुळे त्या जबाबदारीच्या पदावर काम करत होत्या. निकालाच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला गेल्या होत्या. मुलगा शर्मद कोल्हापूर येथे शिक्षण घेत असून संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला. त्यामुळे आई साक्षी यांना प्रचंड आनंद झाला होता. ऑफिसमध्ये त्या वॉशरूममध्ये गेल्या आणि अचानक चक्कर येऊन कोसळल्या.

“जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते,” मोदींच्या आवाहनावरून शिंदेची विरोधकांवर टीका

सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर आणत फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन दिवस उपचार सुरू असूनही त्या कोणताही प्रतिसाद देत नव्हत्या. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. साक्षी आणि त्यांचे पती शिरीष सोनावणे यांनी तीन वर्षांपूर्वीच अवयवदानाची ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर शिरीष सोनावणे यांनी मुलगा शर्मद आणि मुलगी राज्ञी यांच्याशी चर्चा करून अवयवदानाचा निर्णय घेतला.

“तिला उपचारातून वाचवता आलं नाही, पण अवयवदानातून तरी ती जिवंत राहावी, हीच आमची इच्छा होती. खंत एवढीच कि मुलगा दहावीत ९२ टक्के मिळवून आणि संस्कृत मध्ये पैकीच्या पैकी मिळवले याचा आनंद आम्ही एकत्र कुटुंबात साजरा करू शकलो नाही’, अशी माहिती अवयदात्रीचे पती शिरीष सोनवणे यांनी दिली.

Maharashtra Politics:  राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक

Web Title: Sakshi sonawane organ donation after son ssc success emotional story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Mumbai
  • Organ Donation
  • SSC Result

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.