उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. “युद्धाचा फटका देशाला कमीत कमी बसला पाहिजे यासाठी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच प्रधानमंत्री मोदी यांनी आवाहन केले हवे. ज्या माध्यमातून इंधनाची बचत करता येईल ती आपण केली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देतोय,” असे ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी इंधन बचतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर सरकारी कामदेखील याचे पडसाद दिसू लागले आहेत. सरकारी खर्चामध्ये कपात करण्याच्या उद्देशाने, त्यांनी आपल्या अधिकृत ताफ्याचा (कॉन्व्हॉयचा) आकार निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटू लागल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. मंत्र्यांच्या ताफ्यातदेखील घट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत मोठे भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “माझ्या ताफ्यातील गाड्या मी कमी केल्या आहेत. यापुढे केवळ सुरक्षेसंबंधी आवश्यक गाड्याचं माझ्या ताफ्यात राहतील. मोदीजींनी जे आवाहन केले आहे ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिल पाहिजे. मोदीजींनी काटकसरीचं नियोजन सांगितलं आहे, त्याप्रमाणे पेट्रोल डिझेल याचा वापर कमी झाला पाहजे. क्रूड ऑइल आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो, त्यामुळे परकीय चलन जाते. म्हणून इंधन काटकसरीने वापरले पाहिजे. सर्व भारतीयांनी देशहितासाठी हे स्वीकारलं पाहिजे.”
Maharashtra Politics: राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला. या निर्णयामागे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे, अशातच आज मुख्यमंत्री फडणवीसांनी आज मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. राज्यातील सर्व मंत्र्यांचे ताफे अर्ध्यावर करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा दौरा रद्द केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले की, पंतप्रधानांनी देशहितासाठी चांगला निर्णय घेत जनतेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केलं आहे. प्रामुख्यांने ती आमचीही नैतिक जबाबदारी ठरते. मीसुद्धी इलेक्ट्रीक कारमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अध्यक्षांनी सांगितल्यानंतर जपानचा दौराही रद्द केला आहे.
“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद






