Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “नगर परिषदांप्रमाणेच महापालिकांमध्येही महायुतीची त्सुनामी धडकणार,” संजय निरुपम यांचा विश्वास

Sanjay Nirupam on Mahayuti : नगर परिषद निकालांत शिवसेनेचा ५५ टक्के स्ट्राईक रेट आहे. तर कोकणातील मतदारांनी उबाठाला हद्दपार केले आहे. एकंदरित काय तर नगर परिषदांप्रमाणेच महापालिकांमध्येही महायुतीची त्सुनामी धडकणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 23, 2025 | 04:46 PM
"नगर परिषदांप्रमाणेच महापालिकांमध्येही महायुतीची त्सुनामी धडकणार," संजय निरुपम यांचा विश्वास

"नगर परिषदांप्रमाणेच महापालिकांमध्येही महायुतीची त्सुनामी धडकणार," संजय निरुपम यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीत महायुतीची त्सुनामी लाट धडकणार
  • हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला कोकणातील मतदारांनी हद्दपार केले
  • संजय निरुपम यांची उबाठावर टिका
मुंबई : नगर परिषद आणि नगर पंचायती निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढले मात्र यात जनतेने तिन्ही पक्षांना विजयी केले. महायुतीची त्सुनामी या निवडणुकीत दिसली. नगर परिषदांप्रमाणेच आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची त्सुनामी लाट धडकणार, असा विश्वास शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला कोकणातील मतदारांनी हद्दपार केले, अशी टीका निरुपम यांनी केली.

निरुपम म्हणाले की, या निवडणुकीत ६३ टक्के स्ट्राईक रेटसह भाजप पहिल्या क्रमांकावर असून शिवसेना ५५ टक्के स्ट्राईक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४ टक्के स्ट्राईक रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरीही त्यांच्या विजयाचा कौल नगर परिषदांमधील मतदारांनी दिल्याचे निरुपम म्हणाले. महाराष्ट्रातील मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीच्या कारभारावर शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. या यशात लाडकी बहिण, शेतकरी, युवा, ज्येष्ठ यांचे योगदान आहे. अशाच प्रकारचे यश महापालिका निवडणुकांमध्ये मिळेल आणि जास्तीत जास्त महापालिकांवर महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

E-Peek Pahani Survey: ई-पिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; ऑफलाईन पिक पाहणीसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज

निरुपम पुढे म्हणाले की, या निकालातून उबाठाची कामगिरी आणखी खालावली असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून उबाठा हद्दपार झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात उबाठाचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही. या निकालांमधून उबाठाच्या नेतृत्वाला मतदारांनी स्पष्ट नाकारले. नगर परिषद निकालांमध्ये उबाठा पाचव्या क्रमांकावर असून त्यांचा स्ट्राईक रेट केवळ १८.५ टक्के इतका राहिला. शिवसेनेचे ५३ नगराध्यक्ष निवडून आले तर उबाठाचे फक्त ९ नगराध्यक्ष विजयी झाले. उबाठाची अवस्था आता एकेरी आकड्यांपर्यंत खाली आल्याची टीका निरुपम यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे खरे वारसदार शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांनी दाखवून दिले. चार वर्षांपूर्वी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर विकास आणि लोककल्याण या दोन मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी राज्यभर काम केले आणि मराठी माणसांचे मन जिंकले, असे निरुपम म्हणाले. विधानसभेतील यशाबाबत शिवसेनेवर विरोधकांनी टिका केली होती हे यश भाजपमुळे मिळाले, असे विरोधक म्हणत होते. मात्र नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये शिवसेनेने बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढून विजयश्री खेचून आणली, असे निरुपम म्हणाले. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चांदा ते बांदापर्यंत पोहोचला आहे, असे निरुपम म्हणाले.

Pune Breaking News: ठरलं तर…! पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, तारीखही निश्चित

Web Title: Sanjay nirupam believes just like in municipal councils a tsunami of grand alliances will also strike the municipal corporations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Sanjay Nirupam

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “नकली सब घर पे, असली…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
1

Maharashtra Politics: “नकली सब घर पे, असली…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Maharashtra Politics : ‘भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर…’; अंबादास दानवे यांचे मोठं विधान
2

Maharashtra Politics : ‘भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर…’; अंबादास दानवे यांचे मोठं विधान

Zilla Parishad Election 2025: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार
3

Zilla Parishad Election 2025: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?
4

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.