'बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व...'; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?
Sanjay Raut News: गेल्या आठवड्यात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामना’त संपाजकीयच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आहे. दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म’ आणि ‘धर्माची देवळे’ या पुस्तकाचा संदर्भ देत त्याची निंदा करणारे उच्च दर्जाचे अंधभक्त होते. अशी घणाघाती टीका केली आहे.
“सरन्यायाधीश भूषण गवई आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे हिंदू खतऱ्यात आला असे बोलणे हे माथेफिरूपणाचे लक्षण मानावे लागेल. हासुद्धा हल्लाच! भूषण गवईंवर हल्ला करू पाहणारे आणि प्रबोधनकारांच्या पुस्तकांना नाकारणारे एकाच प्रतीचे पहिल्या धारेचे अंधभक्त आहेत. काय तर म्हणे, सनातन्यांचे हिंदुत्व धोक्यात आले.”
“पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत बुवाबाजीला ऊत आला आहे. बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व बनले आहे. या बुवाबाजीविरुद्ध बोलणारे आणि लिहिणारे ‘सनातन धर्म’ नामक विचारसरणीचे लक्ष्य ठरत आहेत. हिंदूंच्या मतावर भाजप निवडणुकांत विजय मिळवत आहे, पण मोदींच्या राजवटीत हिंदूंना उगाच असुरक्षित वाटू लागले. काँग्रेस राज्यात मुसलमानांचे लांगूलचालन सुरू होते. त्यामुळे ‘हिंदू खतरे में’ होता, पण 11 वर्षांपासून कडवट हिंदूंचे राज्य भारतावर असतानाही हिंदू पुनः पुन्हा खतऱ्यात असल्याची बोंब मारली जात आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे.
”दिल्लीतील स्वामी चैतन्यानंदला आता अटक झाली आहे. आपल्या आश्रमात त्याने अनेक महिलांचे यौन शोषण आणि बलात्कार केले व या सर्व पीडित तरुणींना न्याय देण्यास पोलिसांनी आधी नकार दिला, पण पापाचा घडा भरला. हा स्वामी चैतन्यानंद सरस्वती भारतीय जनता पक्षाचा लाडका प्रचारक होता व स्वामीजी सनातन धर्मावर प्रवचने झोडत होता. या स्वामीवर त्याच्या घाणेरड्या कृत्यांचा जाब विचारण्यासाठी चप्पल फेकावी असे सनातन्यांना का वाटले नाही? आसाराम, रामरहीम, स्वामी नित्यानंद, निर्मल बाबा अशा अनेक सनातनी बाबांचा पर्दाफाश झाला आहे.”
Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात!आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जागी
” बागेश्वर बाबा हा भाजपचा प्रचारक असून बाबा आपले लहान भाऊ असल्याचे सांगत पंतप्रधान त्याच्या आश्रमात जातात. विज्ञानाच्या कपाळावर खिळा ठोकण्याचा हा प्रयत्न आहे. जातीयवाद व धर्मांधता वाढवून राजकारण करणारे पंतप्रधान या देशाला लाभले आहेत. ते स्वतःस ईश्वरी अवतार असल्याचे समजतात. प्रबोधनकार ठाकरे यांनी याच ढोंगावर प्रहार केले.” असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भारतीय जनता पक्ष, संघ परिवाराने सध्या जो धर्म पोसला आहे तो हिंदूंचा खरा धर्मच नव्हे. आजही हा भिक्षुकशाहीचाच धर्म आहे. बुळय़ा, बावळ्या, खुळ्यांना झुलवून एका विशिष्ट वर्गाची तुंबडी भरणारे हे एक पाजी थोतांड असल्याचे परखड मत प्रबोधनकारांनी निर्भीडपणे मांडले, असंही त्यांनी म्हटलं आहे.