Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Accident News: मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा, रोहिदास मुंडे यांचा गंभीर आरोप

Rohidas Munde on Railway Accident: कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सर्वत्र भागातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2025 | 04:45 PM
मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा, रोहिदास मुंडे यांचा गंभीर आरोप

मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा, रोहिदास मुंडे यांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

Rohidas Munde on Mumbai Local In Marathi: ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले. याचदरम्यान आता रोहिदास मुंडे यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.

‘मोदी सरकारची ११ वर्षे, फक्त प्रचार, पण…; मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजता घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरारक पुरावा आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनमधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना थरकाप उडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही आणी हीच बाब धक्कादायक आहे. गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते. ही बाब नवीन नाही, मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची?

कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबाचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.”

रोहिदास मुंडे यांच्या मागण्या

  • या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी.
  • मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किमान ₹२५ लाखांची नुकसानभरपाई द्यावी.
  • दरवाजांमध्ये लटकणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात.
  • दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ चालू करावी.
  • लोकल गाड्यांचे फेऱ्या वाढवून गर्दी कमी करण्याचे धोरणात्मक पावले उचलावीत.
  • सदर घटना ही केवळ अपघात नसून, ती व्यवस्थेतील दोषांचे भयावह दर्शन आहे. जेव्हा जनतेचा जीव धोक्यात येतो, तेव्हा तो केवळ “दुर्दैवी अपघात” म्हणून सोडवणूक करणं ही संवेदनाशून्यता आहे.
  • रेल्वे प्रशासनाने आता तरी जागं व्हावं असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

Mumbai Local Train : लवकरच दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार! श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

Web Title: Severe negligence of the railway administration regarding the mumbra railway accident serious allegations by rohidas munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • Railway Accident News
  • thane
  • Train

संबंधित बातम्या

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
1

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
4

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.