Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kopar Railway Station: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन! हर्षद पाटील आक्रमक

Kopar Railway Station: कोपर रेल्वे स्थानकात प्रवासी रेल्वे रुळांच्या मध्यभागी बसून प्रवास करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी स्टेशन मास्तरांची भेट घेऊन निवेदन दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2026 | 06:05 PM
प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन! हर्षद पाटील आक्रमक

प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन! हर्षद पाटील आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
  • आठ दिवसांत उपाययोजना करा
  • अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन!
  • हर्षद पाटील आक्रमक
Kopar Railway Station: कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्थानकात प्रवासी रेल्वे रुळांच्या मध्यभागी मोठ्या संख्येने बसून प्रवास करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे.

प्रवाशांच्या जीवाला धोका

मनसे विभागाध्यक्ष रितेश म्हात्रे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा गंभीर प्रकार समोर आणला होता. रेल्वे रुळांच्या मध्यभागी बसून प्रवास करणे अत्यंत धोकादायक असून, यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Railway ALP Vacancy: भारतीय रेल्वेत सुवर्णसंधी! तब्बल 11127 पदांवर भरती, पगारापासून अर्जापर्यंत माहिती एका क्लिकवर

या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोपर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरांची भेट घेतली. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

आठ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन!

रेल्वे प्रशासनाने येत्या आठ दिवसांत या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन प्रत्यक्ष उपाययोजनांना सुरुवात करावी. अन्यथा कोपर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाला मनसे स्टाईलने टाळे ठोकण्यात येईल आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा हर्षद पाटील यांनी दिला आहे.  प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा धोकादायक प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

कोपर स्थानकातील या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीच्या वेळेत RPF कडून नियमित गस्त घालणे, रेल्वे रुळांवर उतरणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करणे, उद्घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि MEMU ट्रेनमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असताना रेल्वे प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच कोपर रेल्वे स्थानकातील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न का निर्माण झाला आहे?

    Ans: कोपर रेल्वे स्थानकात काही प्रवासी रेल्वे रुळांच्या मध्यभागी बसून प्रवास करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • Que: मनसेने रेल्वे प्रशासनाला किती दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे?

    Ans: मनसेने रेल्वे प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

  • Que: आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास मनसे काय करणार आहे?

    Ans: आठ दिवसांत ठोस उपाययोजना सुरू न झाल्यास कोपर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाला मनसे स्टाईलने टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी दिला आहे. 

Web Title: Kopar railway station passenger safety mns eight day ultimatum harshad patil sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • MNS
  • railway
  • Train

संबंधित बातम्या

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?
1

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?

Dadar Station Renaming : दादर स्टेशनच्या नामांतराविरोधात मनसेनंतर ठाकरे गटही मैदानात! आमदार महेश सावंत यांनी मांडली भूमिका
2

Dadar Station Renaming : दादर स्टेशनच्या नामांतराविरोधात मनसेनंतर ठाकरे गटही मैदानात! आमदार महेश सावंत यांनी मांडली भूमिका

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण
3

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!
4

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.