महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे.
मुंबई: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही महाविकास आघाडीत विदर्भातील 12 जागांसाठी सुरू असलेला वाद टोकाला गेला आहे. त्यातच भर म्हणून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीची तब्येत बरी असून काही आतले आजार असतात, पण त्यासाठी एक्सरे, एमआर आय करण्याची गरज आहे. असे वक्तव्य करून त्यात संधिग्धता वाढवली आहे. पण आमदार रोहीत पवारांनी मात्र त्यांच्या या वक्तव्यावर सारवासारव कऱण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे मात्र विरोधकांना चांगलीच संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून हाणामारी होण्याची शक्यता असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, विदर्भातील 1. आरमोरी, 2. गडचिरोली. 3. गोंदिया, 4. भंडारा, 5. चिमूर, 6. बल्लारपूर, 7. चंद्रपूर, 8. रामटेक, 9. कामठी, 10. दक्षिण नागपूर, 11. अहेरी, 12. भद्रावती वरोरा या जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद टोकाला गेला आहे.
हेही वाचा: बिश्नोई गँगचे मेंबर आहेत का? पुण्यातील टोळ्यांची पोलिसांकडून झाडाझडती
दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठांशीही चर्चा केली. तर आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांना या वाद मिटवण्यात यश येणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : पुण्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात अंतर्गत नाराजी? भाजप नवीन चेहरे देणार का? कार्यकर्त्यां