Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

२२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दिसत आहे. विशेषतः २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या आठवड्यात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवरील पावसाच्या स्थितीकडे लक्ष लागले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 11, 2026 | 09:39 AM
ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Follow Us
Follow Us:
  • उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता
  • कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज
  • ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचे संकेत
मुंबई : राज्यातून मान्सून माघारी फिरल्यानंतर आता ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचे संकेत मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजाच्या नकाशानुसार, २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दिसत आहे. विशेषतः २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या आठवड्यात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवरील पावसाच्या स्थितीकडे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी भारतीय हवामाशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीतील पावसाचे पावसाची संभाव्य हालचाल दिसून येत आहे. त्यानुसार, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला पश्चिम किनारपट्टीसह दक्षिण भारताच्या काही भागांत पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर
पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्राचा पश्चिम किनारा, कोकण आणि दक्षिण भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत नकाशात दिसतात.

दक्षिण द्वीपकल्पात ईशान्य मान्सूनच्या हालचालीही या काळात महत्त्वाच्या ठरू शकतात. मात्र, विस्तारित श्रेणीतील अंदाज हा संभाव्य पावसाचे चित्र दर्शवतो. त्यावरून एखाद्या शहरात किंवा जिल्ह्यात निश्चितपणे मुसळधार पाऊस पडेल, असा निष्कर्ष काढता येत नाही. प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण, त्याचे क्षेत्र आणि तीव्रता यासाठी हवामान विभागाच्या पुढील अद्ययावत अंदाजांवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता

मुंबई आणि महानगर प्रदेशात सध्या असामान्यरीत्या जास्त तापमान आणि उष्ण, दमट हवामान जाणवत आहे. काही ठिकाणी तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हवामान विश्लेषक अंकुर पुराणिक यांच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस, म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थितीत काहीशी सुधारणा होऊ शकते.

कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत

मुंबई आणि महानगर प्रदेशात सध्या उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवत असून, काही ठिकाणी कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची माहिती पुराणिक यांनी दिली आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सध्या उष्णतेपासून काळजी घेण्याबरोबरच ऑक्टोबरअखेरच्या संभाव्य पावसाच्या स्थितीवरही लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

Web Title: Signs of rain along konkan coast by end of october nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Climate Change
  • Monsoon News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
1

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
2

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
3

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.