Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: आठवड्यातून तीन दिवस मुंबईत थांबा…फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश, काय आहे कारण?

मुंबईत पक्षाची सदस्यता नोंदणी चांगली झाली आहे, पण काही भागात ती होणं बाकी आहे. 19 तारखेपर्यंत सदस्यता पूर्ण करण्याचा उद्देश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 31, 2025 | 04:48 PM
Devendra Fadnavis, Fuel Conservation, Maharashtra Politics,

Devendra Fadnavis, Fuel Conservation, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:

मुंबई:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर झपाट्याने काम सुरू केले आहे. खातेवाटपानंतर त्यांनी मंत्र्यांना कार्यान्वित करण्यात सुरुवात केली आहे आणि आता आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणं सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे, आज फडणवीसांनी मंत्र्यांची बैठक घेतली आणि मंत्र्यांच्या कामासाठी आठवड्याचं वेळापत्रक ठरवलं. भाजप मंत्र्यांचे काम दर 15 दिवसांनी तपासलं  जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज मुंबईत फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत राहतील, तर गुरुवार आणि शुक्रवारला राज्यभरात विभागाच्या कामांचा आढावा घेतील. शनिवारी आणि रविवारी मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवाव्या  लागणार आहे. याचवेळी फडणवीस यांनी मंत्र्यांना वेगवेगळ्या सुचनाही दिल्या आहेत.  आपापल्या विभागातील सुनावणी लांबवू न देता  त्या तातडीने पूर्ण करा, त्यासाठी अधिक वेळ लागला, तर तोही द्या, अशा सूचना  फडणवीसांनी आपापल्या मंत्र्यांना दिल्या आहे.

Varanasi Boat Accident Video: वाराणसीमध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; रेस्क्यू ऑपरेशन सुरू,

सरकार आणि संघटनामध्ये समन्वय साधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवाड्याला बैठक होईल. मंत्र्यांना संघटनेमार्फत आलेल्या लोकोपयोगी कामांचा आढावा घेतला जाईल. तीन महिन्यांनी मुख्यमंत्र्यासोबत भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल.  भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईत पक्षाची सदस्यता नोंदणी चांगली झाली आहे, पण काही भागात ती होणं बाकी आहे. 19 तारखेपर्यंत सदस्यता पूर्ण करण्याचा उद्देश आहे. पीएम मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सदस्यता नोंदणीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचा लक्ष्य आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा चेंडून अजित पवारांच्या कोर्टात

दरम्यान, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विधान समोर आले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय अजित पवारच घेतील, असे  म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्याच कोर्टात टाकला आहे.

हा कसला नवा ट्रेंड! ‘या’ देशातील लोक 10 लाख रुपये देऊन अचानक बदलत आहेत डोळ्यांचा रंग

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे हे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत अजित पवार यांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे.” अधिकृत असेल. मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावरच सोडली आणि बीडमधील मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या राजीनाम्याच्या वाढत्या मागणीवर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Stay in mumbai for three days a weekfadnavis order to ministers what is the reason nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
2

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
4

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.