हा कसला नवा ट्रेंड! 'या' देशातील लोक 10 लाख रुपये देऊन अचानक बदलत आहेत डोळ्यांचा रंग, कारण जाणून व्हाल थक्क ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Eye Colour Change : सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांचा अवलंब करतात. चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी बोटॉक्स, फेसलिफ्ट आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर सर्रास होताना दिसतो. मात्र, आता अमेरिकेत एक नवा ट्रेंड वेगाने पसरत आहे – तो म्हणजे डोळ्यांचा रंग कायमस्वरूपी बदलण्याची शस्त्रक्रिया!
डोळ्यांचा रंग बदलण्याचा ट्रेंड का वाढतोय?
अमेरिकेतील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. ब्रायन बॉक्सर वाचलर यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे लोकांना हवे तसे डोळ्यांचे रंग बदलणे शक्य झाले आहे. डॉ. ब्रायन यांच्याकडे लाखो लोक सल्लामसलत करण्यासाठी येतात. त्यांचे TikTok वर 3.4 दशलक्ष आणि Instagram वर 3.19 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे.
शस्त्रक्रिया कशी केली जाते?
या प्रक्रियेला ‘केराटोपिग्मेंटेशन’ (Keratopigmentation) असे म्हणतात. या शस्त्रक्रियेद्वारे डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये विशेष प्रकारचे रंगद्रव्य (pigment) टोचले जाते, ज्यामुळे डोळ्यांचा नैसर्गिक रंग बदलतो. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होते.
credit : social media
डॉ. ब्रायन बॉक्सर यांच्या मते, ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे आणि लॅसिकशिवाय डोळ्यांच्या दृष्टीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना फक्त सुन्न करणारे थेंब दिले जातात, त्यामुळे कोणत्याही वेदना होत नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकन सिनेटमध्ये ‘जय श्री कृष्ण’ म्हणत काश पटेल यांनी जिंकली मने; ट्रम्प यांच्या FBI चीफचा व्हिडिओ व्हायरल
या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. परंतु, या प्रक्रियेसाठी प्रत्येक डोळ्यासाठी 6000 डॉलर, म्हणजेच एकूण 12,000 डॉलर (सुमारे 10 लाख भारतीय रुपये) खर्च येतो! तरीही, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक लोक हा खर्च करण्यास तयार आहेत.
लोक का करत आहेत डोळ्यांचा रंग बदल?
सौंदर्य वाढवण्यासाठी – अनेकांना डोळ्यांचा वेगळा रंग हवा असतो, जो त्यांना आकर्षक वाटतो.
नवीन ट्रेंड – सोशल मीडियामुळे नवीन ट्रेंड वेगाने पसरतात आणि लोक त्याला सहज बळी पडतात.
स्वतःत बदल घडवण्यासाठी – काही लोकांना नवा लूक हवा असतो, म्हणून ते ही शस्त्रक्रिया करतात.
डोळ्यांचा रंग बदलण्याचे भविष्यात परिणाम?
जरी ही प्रक्रिया सुरक्षित मानली जात असली, तरी भविष्यात त्याचे काही दूरगामी परिणाम होऊ शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांचा रंग बदलण्यामुळे प्रकाशसंवेदनशीलता (light sensitivity) वाढू शकते आणि डोळ्यांच्या नैसर्गिक संरचनेवर परिणाम होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेतील विमान अपघातावर ट्रम्प यांचे वादग्रस्त विधान सोशल मीडियावर चांगलेच गाजले; म्हणाले, ‘मी काय तिथे पोहायला…
नव्या सौंदर्यशास्त्राची क्रांती!
अमेरिकेत सौंदर्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जातो. केराटोपिग्मेंटेशन हे त्या दिशेने एक पाऊल आहे. डोळ्यांचा रंग बदलण्याची संकल्पना विज्ञानाच्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे, पण ते नैसर्गिक सौंदर्यावर कसा परिणाम करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.