Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaslok Hospital : “सगळं संपलं होतं…; पण एका हलक्या हालचालीने दिली नव्या आयुष्याची आशा”, जसलोक हॉस्पिटलचे यश

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीपूर्ण सर्व्हायकल स्पाइन सर्जरी यशस्‍वीपणे पूर्ण केली आहे.या शस्त्रक्रियेमुळे राजीव वरवडे यांना पुन्हा उभे राहणे आणि चालणे शक्य झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 17, 2026 | 06:13 PM
“सगळं संपलं होतं...; पण एका हलक्या हालचालीने दिली नव्या आयुष्याची आशा”, जसलोक हॉस्पिटलचे यश

“सगळं संपलं होतं...; पण एका हलक्या हालचालीने दिली नव्या आयुष्याची आशा”, जसलोक हॉस्पिटलचे यश

Follow Us
Follow Us:

मुंबई : जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीपूर्ण सर्व्हायकल स्पाइन सर्जरी (मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया) यशस्‍वीपणे पूर्ण केली आहे. या शस्त्रक्रियेमुळे राजीव वरवडे यांना पुन्हा उभे राहणे आणि चालणे शक्य झाले आहे. एका भीषण अपघातात त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्यावर दबाव आला होता आणि त्यांना क्वाड्रिप्लेजिया (चतुष्पाद अर्धांगवायू म्‍हणजेच सर्व हात-पाय निकामी होणे) झाला होता. उपचारांमधील विलंब आणि प्रकृतीची खालावलेली स्थिती पाहता जसलोक हॉस्पिटलमध्ये मिळालेले हे यश खरोखर चमत्कार आहे.

वरवडे कामावरून घरी परतत असताना वाटेत अचानक एक अडथळा आल्याने त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. या धडकेमुळे त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आणि पाठीचा कण्यावर मोठा दबाव आला, परिणामी त्यांच्या खांद्याखालील संपूर्ण शरीर अर्धांगवायूने निकामी झाले. अशा प्रकारच्या गंभीर दुखापतींमध्ये मृत्यूचा धोका खूप जास्त असतो आणि मज्जासंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते (उदा. प्रसिद्ध ‘सुपरमॅन’ फेम अभिनेता क्रिस्‍तोफर रीव्ह यांना झालेली दुखापत).

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा फेरबदल; तब्बल 400 कोटींची अतिरिक्त तरतूद

त्यांच्या भागातील प्रमुख रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. ही दुखापत कायमस्वरूपी असून शस्त्रक्रियेचा कोणताही उपयोग होणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. परिस्थिती अधिकच बिकट झाली, कारण ही शस्त्रक्रिया जीवघेणी ठरली असती आणि रुग्णाला दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर अवलंबून राहावे लागण्याची दाट शक्यता होती. पुढील १५ दिवस ते कोणत्याही निश्चित उपचारांविना घरीच राहिले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती, हात-पाय हलवता येत नव्हते आणि घरी लहान मुले असताना समोर फक्त अनिश्चित भविष्य आणि मृत्यू दिसत होता.

कुटुंबिय उपचारांचे पर्याय शोधत असताना त्यांचा संपर्क जसलोक हॉस्पिटलमधील मिनिमल इन्‍वेसिव्‍ह सर्जरी व स्‍पाइनल डिफॉर्मिटी सर्जरीचे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी यांच्याशी झाला. बीड जिल्ह्यातील अशाच गुंतागुंतीच्या रुग्णांवर डॉ. कोठारी यांनी जसलोक हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार केल्याचे त्यांनी ऐकले होते. डॉ. कोठारी यांनी सुरुवातीला व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे श्री. वरवडे यांची तपासणी केली. या तपासणीत दुखापतीच्या खालच्या दोन्ही हातांना पूर्णपणे अर्धांगवायू झाला असल्याचे आणि पायांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून आले. पण, डॉक्‍टरांना डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये झालेली एक अतिशय सूक्ष्म हालचाल दिसली. यावरून संकेत मिळाले की, पाठीचा कण्याला झालेली दुखापत कायमस्वरूपी नसावी आणि रुग्ण पुन्हा बरा होऊ शकतो. ही एक छोटी, पण अत्यंत महत्त्वाची आशा होती.

वरवडे यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, तेव्हा उपचारांमधील विलंबामुळे त्यांची आधीच गंभीर असलेली प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली होती. या शस्त्रक्रियेमध्ये जगण्याची शक्यता कमी किंवा दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर अवलंबून राहावे लागणे, अशी मोठी जोखीम होती. शस्त्रक्रियेतील धोके आणि त्यातून मिळणाऱ्या संभाव्य निकालांबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

पाठीचा कण्यावरील दबाव कमी करण्यासाठी आणि मणक्याचा जखमी झालेला भाग स्थिर करण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने ही अत्यंत जोखमीची सर्व्हायकल स्पाइन सर्जरी केली. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काळात मज्जासंस्थेमध्ये सुधारणेची सकारात्मक लक्षणे दिसून आली. अवघ्या दोन आठवड्यांत वरवडे आधार घेत चालू लागले. आज तीन महिन्यांनंतर, ते कोणाच्याही मदतीशिवाय स्‍वत:हून चालत आहेत आणि आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी म्हणाले, “राजीव यांच्या केसमधील आव्‍हानात्‍मक बाब म्‍हणजे, शस्त्रक्रिया तंत्रज्ञानदृष्ट्या यशस्वी झाली तरीही ते आयुष्यभर व्हेंटिलेटरवर अवलंबून राहण्याची दाट शक्यता होती. ऑपरेशन थिएटरमध्‍ये प्रत्येक निर्णय घेताना या जोखमीचा विचार करावा लागत होता. आम्‍ही पाठीच्या कण्यावरील दबाव कमी करण्‍यासोबत त्यांना स्वतःहून श्‍वास घेता यावा आणि स्वतंत्र आयुष्य जगता यावे, यासाठी संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले होते. आज त्यांना व्हेंटिलेटरच्या आधाराशिवाय बरे झालेले पाहताना खूप आनंद होत आहे.”

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्हणाले, “राजीव यांच्‍या केसमधून निदर्शनास येते की, टर्शियरी केअर सेंटर्सनी अशा केसेसची हाताळणी करण्‍यासाठी सुसज्‍ज असले पाहिजे. इतर हॉस्पिटल्‍स जोखमीमुळे उपचार करण्यास नकार देतात, तेव्हा योग्य तज्ज्ञ, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि क्रिटिकल केअर सपोर्ट असलेल्या संस्थांनी पुढे येणे अनिवार्य असते. या केसमध्ये मिळालेल्‍या यशामधून आमचा समन्वित, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आणि अत्यंत आव्हानात्मक केसेसना यशस्वीपणे हाताळण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

राजीव वरवडे म्हणाले, “अपघातापूर्वी मी अतिशय सक्रिय होतो, पण अपघातानंतर अचानक माझी हालचाल पूर्णपणे थांबली आणि माझे हात-पाय निकामी झाले. त्यानंतरचे दिवस अनिश्चितता आणि भीतीने भरलेले होते, विशेषतः आम्हाला या दुखापतीच्या गांभीर्याबद्दल सांगण्यात आले तेव्‍हा आम्‍ही खूप अस्‍वस्‍थ झालो. जसलोक हॉस्पिटलमध्ये येणे हा आमचा शेवटचा आशेचा किरण होता. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण मी पहिल्यांदा आधाराने उभा राहिलो, तो माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक क्षण होता. आज पुन्हा स्वतःच्या पायावर चालताना पाहून मला नवीन जीवनदान मिळाल्‍यासारखे वाटते.” या केसमधून जसलोक हॉस्पिटलची गुंतागुंतीच्या आणि अत्यंत जोखमीच्या स्पाइनल ट्रॉमा (मणक्याच्या गंभीर दुखापती) शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची क्षमता दिसून येते. तसेच, आशा धूसर असते अशा कठीण परिस्थितीत रुग्णाची हालचाल पूर्ववत करून त्यांना नवे आयुष्य देण्याची क्षमता देखील निदर्शनास येते.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

Web Title: Success of jaslok hospital complex spine surgery gave the patient a new life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Jaslok Hospital
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे
1

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
2

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
3

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
4

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.