Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Manoj Jarange React on Ramdas Kadam:रामदास कदम येडा झाला आहे, त्याला लवकरात लवकर दवाखान्यात न्या! त्यापेक्षा संजय राऊत बरे आहेत, ते एकदा सकाळी मीडियासमोर येतात आणि विषय संपवतात."

  • By anuradha sagar
Updated On: Oct 23, 2026 | 04:40 PM
Manoj Jarange Patil, Ramdas Kadam, Eknath Shinde

Manoj Jarange Patil, Ramdas Kadam, Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • रामदास कदमांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटलांचे सडेतोड उत्तर.
  • ऑडिओ क्लिप कशी व्हायरल झाली हे देवेंद्र फडणवीसांना जाऊन विचारा” – जरांगे पाटील
  • रामदास कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ‘साडेसाती’
Manoj Jarange React on Ramdas Kadam:  “आम्ही तुम्हाला विचारतोय की तुम्हाला त्या ऑडिओ क्लिपची तारीख आणि वेळ कशी माहिती झाली? ती क्लिप व्हायरल कशी झाली, हे जाऊन फडणवीसांना विचारा. मीडियाला धमक्या देऊ नका.” अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पाशचे कोटींच्या कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यांवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर जरांगे यांनी रामदास कदम यांच्या मानसिक स्थितीवर आणि राजकीय भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकी

ऑडिओ क्लिप आणि तारीख कशी समजली?

रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जरांगे म्हणाले, ” तसेच, भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबतच्या जेवणावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “प्रसाद लाड जेवायला आले तर तुमची पोटदुखी का होते, तुम्हाला जेवढ्या खोलात जायचंय तेवढं जाऊन बघा. तुम्ही चिल्लर माणसासारखे वागू लागेल आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.

रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांचाही त्यांनी समाचार घेतला. “तुझ्या म्हाताऱ्याने कोणाची सुपारी घेतलीये, हे आधी बघ, सुपारी तर तुमच्या घरातच आहे. त्याचं नाव सांगा, तो कोण आहे ते आम्हीच शोधून काढू शकतो.” असे आव्हानही जरांगेनी दिले आहे.

“रामदास कदम हेच शिंदेंना संपवायला निघालेत”

“रामदास कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ‘साडेसाती’ आहेत. रामदास कदम स्वतः बोलायला एवढी बुद्धी आहे का? ते त्रिकोणी आहेत. शिंदे साहेब बदनाम व्हावेत म्हणून यांनी खूप काही जमा करून ठेवलंय. हा माणूस शिवसेना संपवायला निघाला आहे.”

पुढे उपरोधिक टोला लगावत जरांगे म्हणाले, “रामदास कदम येडा झाला आहे, त्याला लवकरात लवकर दवाखान्यात न्या! त्यापेक्षा संजय राऊत बरे आहेत, ते एकदा सकाळी मीडियासमोर येतात आणि विषय संपवतात.”

रामदास कदम यांचे आरोप

रामदास कदम यांनी घेतलेली पत्रकार परिषद घेत भाजपवरच प्रहार केला आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली. या ऑडिओ क्लिपला रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजपने कुणाकडून सुपारी घेतली आहे, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही रामदास कदम यांनी केली आहे.

रामदास कदम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबत जेवण करतात, जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या भेटीचे फोटोही यावेळी रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत शेअर केले. त्यामुळए जरांगे पाटील आणि भाजप नेते एकत्र मिळून एकनाथ शिंदेंविरोधात कट रचत असल्याचा दावाही कदम यांनी यावेळी केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que:  रामदास कदम यांच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिले?

    Ans: मनोज जरांगे म्हणाले की, ऑडिओ क्लिपची तारीख आणि ती कशी व्हायरल झाली हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना विचारावे. 

  • Que:   प्रसाद लाड यांच्याशी झालेल्या भेटीवर मनोज जरांगे यांनी काय स्पष्टीकरण दिले?

    Ans: प्रसाद लाड जेवायला आल्याने कोणालाही पोटदुखी होण्याचे कारण नाही, रामदास कदम चिल्लर माणसासारखे वागत आहेत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

  • Que:  योगेश कदम यांना मनोज जरांगे यांनी काय आव्हान दिले?

    Ans: जरांगे म्हणाले की, सुपारी देणाऱ्याचे नाव उघड करा, तो कोण आहे ते आम्हीच शोधून काढू; आधी स्वतःच्या घरात कोणाची सुपारी घेतली आहे ते बघा.

Web Title: Manoj jarange patil counter attacks ramdas kadam over audio clip allegations as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange Patil
  • Ramdas Kadam
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप
1

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप
2

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप
3

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
4

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.