Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Babasaheb Ambedkar: भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारकाचे काम प्रगती पथावर

Dr. Babasaheb Ambedkar Memorial: मुंबईतील दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ८५% काम पूर्ण. ४५० फूट उंच पुतळ्याचे भाग मुंबईत दाखल. ₹१०९० कोटींचा हा भव्य प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 05:45 PM
भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार!

भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार!

Follow Us
Close
Follow Us:

 

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रगतीपथावर!
  • पुतळ्याचे भाग मुंबईत दाखल
  • डिसेंबर २०२६ पर्यंत अनावरण होण्याची शक्यता
मुंबई २८ नोव्हेंबर २०२५ नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी स्वप्नील शिंदे : महाराष्ट्रातील दलित चळवळीतील आणि आंबेडकर विचारांच्या नेत्यांकडून वर्ष २००० पासून मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी होत होती. आणि अनेकवेळा आंदोलने करण्यात आली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबई, दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची सर्वांत पहिली घोषणा १८ ऑगस्ट २०१२ मध्ये केली होती. अखेर 19 मार्च, 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र.६ येथील सुमारे 4.८४ हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात आहे.

एकूण खर्च १०९० कोटी रुपयांपर्यंत

या स्मारकाचे काम एप्रिल २०१३ मध्ये सुरू झाले असून, ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून प्रकल्पाचा एकूण खर्च १०९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सदर स्मारक लोकांकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदरांजली असेल.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा

नियोजित स्मारकाचे ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते . हे स्मारक अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या स्मारकापेक्षा उंच दिसणार आहे. स्मारकात १३७.३ मीटर (४५० फूट) उंच पुतळा उभारला जाणार असून ज्याचे बांधकाम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होऊ शकेल यासाठी संपूर्ण जागेची “बगीचे असलेले शांती स्थळ ” म्हणून कल्पना करण्यात आली आहे. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कांस्य धातूने आच्छादीत पुतळयाची उंची 350 फुटाऐवजी (250 फूट उंच पुतळा + 100 फुट उंच पादपीठ) 450 फूट (350 फूट + 100 फूट उंच पादपीठ) असणार आहे.

हे देखील वाचा: अनुसूचित जाती गटासाठी खुशखबर! शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यात मुकलात? शासनाने आणली नवीन योजना

स्मारकातील प्रमुख आकर्षणे

पादपीठामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट व पुतळयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार उतरंड (spiral ramp) आहे. या व्यतिरिक्त सुमारे 1000 आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगिचे, वाहनतळ इत्यादींचा स्मारकामध्ये समावेश आहे. हे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल असे उद्दिष्ट सरकारचे आहे.

भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार!

स्मारकाचे एकूण ८५ टक्के काम पूर्ण झाले असून डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याचे काही भाग मुंबईत दाखल झाले आहेत लवकरच म्हणजे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होऊन स्मारकाचे अनावरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे देशाच्या काना कोपर्यातून दर्शनासाठी येणारे भीमसैनिक इंदू मिल येथील डॉक्टर आंबेडकरांचे भव्य स्मारक बघण्याकरिता कायम आतुर असतात आणि नेहमीच प्रयत्नशील असतात. पुढील वर्षी त्यांची हि प्रतीक्षा संपेल आणि त्यांना भव्य दिव्य अशा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे दर्शन घडेल हि अपेक्षा.

हे देखील वाचा: हिंदू म्हणजे कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Web Title: The wait for bhim sainiks will soon be over dr babasaheb ambedkars grand memorial work on the way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Dr. Manmohan Singh
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Airport News:  ए. बी. डी. मास्ट्रोची मोठी घोषणा! सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओ आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध
1

Mumbai Airport News:  ए. बी. डी. मास्ट्रोची मोठी घोषणा! सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओ आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध

Mumbai Crime : मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ
2

Mumbai Crime : मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ

Mumbai Hoarding: मोठी बातमी! मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत; BMC ने जारी केली नवीन धोरणे
3

Mumbai Hoarding: मोठी बातमी! मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत; BMC ने जारी केली नवीन धोरणे

Mumbai Crime: संतापजनक! नात्याला काळिमा फासणारी घटना, दहावीच्या विद्यार्थिनीला आई आणि शेजाऱ्याने ढकललं वेश्याव्यवसायात अन्…
4

Mumbai Crime: संतापजनक! नात्याला काळिमा फासणारी घटना, दहावीच्या विद्यार्थिनीला आई आणि शेजाऱ्याने ढकललं वेश्याव्यवसायात अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.