Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गोल्डन चौकी परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मोहिमेदरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 09:22 AM
Mira Bhayander: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Mira Bhayander: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गोल्डन चौकी परिसरातील अनधिकृत मशिद आणि मंदिराचे बांधकाम पहाटेच्या कारवाईत हटवले.
  • कारवाईदरम्यान संबंधित मशिदीच्या मौलानांनी प्रशासनाला सहकार्य करत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
  • पोलिसांनी अफवा, तणाव वाढवणारे पोस्ट आणि दिशाभूल करणारे संदेश सोशल मीडियावर प्रसारित न करण्याचा इशारा दिला आहे.
भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेने 8 जून रोजी सोमवारी पहाटे गोल्डन चौकीच्या मागील परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिराचे बांधकाम हटविण्याची मोहीम राबवली. ही कारवाई कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली.

विठ्ठलनामाचा गजर थेट लंडनहून! पंढरीची वारी झाली ग्लोबल; लंडन ते पंढरपूर ५० दिवसांत ११ देशांचा प्रवास

गोल्डन चौकी परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अनधिकृत मशिद आणि मंदिराशी संबंधित बांधकामे हटविण्यात आली. कारवाईदरम्यान गोल्डन चौकी परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. पहाटेपासूनच मनपाच्या पथकाने जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्याचे काम सुरू केले. प्रशासनाने ही कारवाई कोणत्याही धर्माविरोधात नसून अनधिकृत बांधकामांविरोधातील नियमित प्रशासकीय कारवाई असल्याचे स्पष्ट केले.

मीरा-भाईंदर शहरात विविध कारणांमुळे अनेकदा धार्मिक आणि सामाजिक वाद समोर येत असतात. मात्र या कारवाईदरम्यान एक सकारात्मक बाब समोर आली. संबंधित मशिदीचे मौलाना स्वतः पुढे येत प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करताना दिसले. त्यांनी प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करत केले. ही कारवाई अनधिकृत बांधकामांवर होत असल्याने मौलाना यांनी प्रशासनाला पाठिंबा दर्शविला आणि नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि समाजमाध्यम वापरकर्त्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आहे की, या कारवाईशी संबंधित कोणतेही तणाव वाढवणारे, दिशाभूल करणारे अथवा समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ, फोटो किंवा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी पोलिसांनी दिला आहे.

ईस्राइल मध्ये स्थापन होणार छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा! महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!

प्रशासनाने स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही धर्माशी संबंधित नसून पूर्णपणे अनधिकृत बांधकामांवर करण्यात आलेली नियमित प्रशासकीय कारवाई आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषयाकडे कायद्याच्या चौकटीतून पाहावे आणि शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावे. या कारवाईनंतर परिसरात शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Unauthorized mosque and temple structures removed in mira bhayandar amid tight security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
2

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
3

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.