Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सावली तालुक्यातील नि. पेठगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2026 | 02:42 PM
Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • शाळेला लागूनच जंगल असल्याने परिसरात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला
  • संरक्षण भिंत नसल्यामुळे वन्यप्राणी थेट शाळेच्या परिसरात शिरण्याची शक्यता
  • सावली येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संरक्षण भिंतीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
चंद्रपूर: सावली तालुक्यातील नि. पेठगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत मागील चार वर्षांपासून अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेला लागूनच जंगल असल्याने परिसरात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संभाव्य धोका लक्षात घेता संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

पेठगाव परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेपासून काही मीटर अंतरावर वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी शाळेला लागूनच वाघाने डुकराची शिकार केली. यंदा परिसरात वाघाच्या हल्ल्यांत चार ते पाच बैल आणि गायी ठार झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

शाळेच्या आवारात लहान मुले खेळत असतात. अशा परिस्थितीत संरक्षण भिंत नसल्यामुळे वन्यप्राणी थेट शाळेच्या परिसरात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मंजूर करण्यात आले होते. मात्र, चार वर्षांचा कालावधी उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही.

संरक्षण भिंतीचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे की नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती, सावली येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संरक्षण भिंतीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून कामातील विलंबाची कारणे आणि निधीच्या उपलब्धतेबाबत अहवाल तयार करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद उमाजी किनेकर यांच्या पुढाकाराने हा प्रश्न ग्रामसभेत मांडण्यात आला. शाळा परिसराची पाहणी करणे, वनविभागाची गस्त वाढविणे आणि संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करणे, यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आला.

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा

तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजनांची मागणी

संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होईपर्यंत वन विभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी, आवश्यक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावावेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न गंभीर असतानाही संरक्षण भिंतीचे काम चार वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता तरी संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur school wall incomplete for four years students face threat from tigers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल
1

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती
2

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज
3

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी
4

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.