Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

चंद्रपूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम आता शेती आणि औद्योगिक क्षेत्रावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र, कोळसा खाणी आणि शेतीसाठी वर्धा नदी महत्त्वाचा जलस्रोत मानली जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2026 | 02:26 PM
Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

Follow Us
Follow Us:
  • पाणीटंचाईचे संकट आता शेतीपाठोपाठ औद्योगिक क्षेत्रालाही भेडसावण्याची शक्यता
  • चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या उद्योगांवर जलसंकटाचे गडद सावट
  • आगामी काळात उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती
चंद्रपूर: यंदा जिल्ह्यात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे संकट आता शेतीपाठोपाठ औद्योगिक क्षेत्रालाही भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः वर्धा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या उद्योगांवर जलसंकटाचे गडद सावट पसरले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह घटल्याने आगामी काळात उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

जलसंकटाची तीव्रता वाढण्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन, एमआयडीसी प्रशासन, विविध उद्योगांचे व्यवस्थापन आणि औद्योगिक संघटनांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. उद्योगांना पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना देण्यात येत असून, उपलब्ध जलसाठ्याचा जपून वापर करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, नदीतील पाण्याची उपलब्धता आणखी घटल्यास औद्योगिक उत्पादनावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र, कोळसा खाणी आणि शेतीसाठी वर्धा नदी महत्त्वाचा जलस्रोत मानली जाते. चंद्रपूर, ताडाळी, घुग्घुस, वरोरा आणि बल्लारपूरसह चंद्रपूर शहरातील एमआयडीसी क्षेत्रातील अनेक उद्योगांची पाण्याची गरज या नदीवर अवलंबून आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा विचार

औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची वाढती गरज आणि घटती उपलब्धता लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने पाणीबचतीसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. उद्योग परिसरात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यापासून सर्व संबंधित उद्योगांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे.

धानोरा बॅरेजचा रखडलेला प्रश्न पुन्हा चर्चेत

वर्धा नदीवरील धानोरा परिसरात बॅरेज उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या बॅरेजची उभारणी झाल्यास औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासोबतच चंद्रपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही काही प्रमाणात दिलासा मिळू शकला असता. मात्र, हा प्रस्ताव प्रत्यक्षात न आल्याने पाणीसाठा आणि नियोजनाचा प्रश्न कायम आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा बसतोय मोठा फटका; दुष्काळाच्या चाहुलीने शेतकरी धास्तावले

यंदा वर्धा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पाणी साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या बॅरेजच्या अभावामुळे पुराचे मोठ्या प्रमाणातील पाणी पुढे वाहून गेले. ते पाणी वैनगंगा आणि प्राणहिता नद्यांच्या प्रवाहातून गोदावरी नदीत मिसळले. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी साठवून त्याचा उन्हाळ्यात आणि टंचाईच्या काळात उपयोग करता आला असता, अशी चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Water crisis looms over chandrapur industries as wardha river flow declines hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती
1

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी
3

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टींना एवढे महत्त्व का? छगन भुजबळ यांचे वक्यव्य
4

पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टींना एवढे महत्त्व का? छगन भुजबळ यांचे वक्यव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.