Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar : मनपाने नियमाचं उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप; प्रभाग समिती कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेवरून गोंधळ

वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती 'अ' च्या नवीन कार्यालयाचा शुक्रवारी सायंकाळी लोकार्पण होणार असल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 12:52 PM
Vasai Virar : मनपाने नियमाचं उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप; प्रभाग समिती कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेवरून गोंधळ
Follow Us
Follow Us:
  • मनपाने नियमाचं उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप;
  • प्रभाग समिती कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेवरून गोंधळ
वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ च्या नवीन कार्यालयाचा शुक्रवारी सायंकाळी लोकार्पण होणार असल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. मात्र या निमंत्रण पत्रिकेत आमदार – खासदार यांची नावे वगळण्यात आल्याने महापालिकेने राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे.विरार पश्चिम येथे महापालिकेने प्रभाग समिती अ चे नवीन कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा हा 13 मार्च 2026 शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे.

महापालिकेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिका प्रसारित होताच त्यावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे.कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेत आमदार खासदार यांची नावे वगळण्यात आली असून एकप्रकारे हे राजशिष्टाचाराचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकातील कलम 3 आणि 5 चे उघड उल्लंघन या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत झाल्याचे बारोट यांनी निदर्शनास आणून दिले.राजशिष्टाचारानुसार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची नावे पत्रिकेत असणे बंधनकारक असताना, खासदार डॉ. हेमंत सवरा, वसईच्या आमदार स्नेहा दुबे, बोईसरचे आमदार विलास तरे आणि पालकमंत्र्यांची नावेच निमंत्रण पत्रिकेतून गायब आहेत. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार राजन नाईक यांचे नाव माजी पदाधिकारी आणि उपमहापौर यांच्या नावाखाली छापून त्यांचा अवमान केल्याचा दावा भाजपने केला आहे.

प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून हा कार्यक्रम आयोजित केला असून या छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत केवळ बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची नाव असल्याने हा कार्यक्रम महापालिकेचा आहे की एका विशिष्ट राजकीय पक्षाचा असा सवाल भाजपचे मनोज बारोट यांनी केला आहे.याप्रकरणी आयुक्ताचे निलंबन करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आणि बविआ असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

महापालिकेने पत्रिका छापल्या नसल्याचा खुलासा

वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘ए’ बोळींजच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि चंदनसार येथील ट्रॉमा सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन उद्या, 13 मार्च 2026 रोजी आयोजित केल्याबाबतच्या निमंत्रण पत्रिका सध्या सर्वत्र फिरत आहेत. मात्र, या पत्रिका महानगरपालिकेने अधिकृतरित्या छापलेल्या किंवा वाटप केलेल्या नाहीत, असा स्पष्ट खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे.या प्रकरणी महापालिकेकडून चौकशी करण्यात येत असून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल असे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

कोळसा वाहतुकीसाठी GPS अनिवार्य; प्रदूषण रोखण्यासाठी ‘चंद्रपूर मॉडेल’; शंभूराज देसाई यांची माहिती

Web Title: Vasai virar bjp alleges that the municipal corporation violated the rules confusion over the invitation letter of the ward committee office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • navrashtra news
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख
1

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा; केंद्र सरकारकडून वनजमिनीच्या हस्तांतरणाला अंतिम मंजुरी!
3

Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा; केंद्र सरकारकडून वनजमिनीच्या हस्तांतरणाला अंतिम मंजुरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.