Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

Vasai Virar Mangrove Scam : शहरांचा विस्तार आणि अनधिकृत बांधकामांच्या हव्यासापोटी वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरातील नैसर्गिक कवच मानल्या जाणाऱ्या कांदळवनांची कत्तल आणि भू-माफियांकडून भराव टाकण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 12:04 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरुच
  • वसई-विरार, मिरा भाईंदर परिसरातील वास्तव
  • पर्यावरण गुन्ह्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
Vasai Virar Mangrove Scam : शहरांचा विस्तार, अनधिकृत बांधकामे आणि जमिनीच्या वाढत्या किंमतीच्या हव्यासापोटी वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरातील कांदळवनांवर घाला सुरूच आहे. कांदळवनांची कत्तल, माती व बांधकामाच्या राड्याचा भराव जलस्रोतांवरील आणि अतिक्रमणाच्या घटनांवर दोनशेहून गुन्हे दाखल होऊनही त्यांचा तपास संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी मिरा-भाईंदर, वसई-विरार ( Vasai Virar Mangrove Scam ) पोलीस आयुक्तालयाबाहेर शांततापूर्ण निदर्शने केली. त्यानंतर याप्रश्नाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Palghar Land Records Scam : शासकीय मोजणीचे कोट्यवधी रुपये खासगी खात्यात? भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा कारनामा; बदलीनंतर भांड फुटलं!

२००५ ते २०२५ या कालावधीत मिरा भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत दाखल झालेल्या २०० हून अधिक पर्यावरणीय गुन्ह्यांची विशेष तपासणी करावी. या गुन्ह्यांमध्ये तपास अधिकाऱ्यांची भूमिका, तपासातील त्रुटी आणि प्रकरणे प्रलंबित राहण्यामागील कारणांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कांदळवनांची तोड करून बांधकामाचा राडा

विशेष म्हणजे, कांदळवन तोडीच्या घटना केवळ आरोपांपुरत्या मर्यादित नसून त्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. जून २०२५ मध्ये नायगाव पूर्वेतील मालजीपाडा परिसरात कांदळवनांची तोड करून बांधकामाचा राडा टाकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १५ आणि १९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी २०१९ मध्ये वसईतील सांडोर परिसरात सुमारे तीन एकर क्षेत्रातील जवळपास तीन हजार कांदळवने नष्ट केल्याचे प्रकरण समोर आले होते, या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, एकाला अटक झाली आणि १५ लाख रुपांचा दंडही करण्यात आला होता.

मिरा-भाईंदरमध्येही कांदळवनांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर

२०२६ मध्ये नायगाव पूर्व परिसरात कांदळवनांना आग लावून ती नष्ट करण्याचा प्रकारही समोर आला असून, या घटनेनंतर पर्यावरणप्रेमींनी कारवाईची मागणी केली होती. मिरा-भाईंदरमध्येही कांदळवनांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याचे विविध घटनांतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वसई-विरारमध्ये सुमारे २ हजार ९६९ हेक्टरहून अधिक कांदळवन क्षेत्र आता महसूल विभागाकडून स्वतंत्र कांदळवन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे

पर्यावरण संवर्धनाचे नैसर्गिक कवच

गुन्हे दाखल होतात, पण पुढे काय?’ हा प्रश्न पर्यावरणप्रेमीनी उपस्थित केला आहे. पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करून दोषीवर कठोर कारवाई झाली नाही, तर कांदळवने, पाणथळ जागा, खाड्या आणि जैवविविधतेचे अस्तित्वच धोक्यात येईल, काांदळवन हे केवळ झाडांचे पट्टे नसून समुद्राच्या लाटांपासून किना-याचे संरक्षण करणारे नैसर्गिक कवच, पूरनियंत्रणातील महत्वाचा घटक आणि असंख्य जलचर व पक्ष्यांचे अधिवास आहेत. त्यामुळे कांदळवनांची तोड, त्यावर भराव आणि जलस्रोतांचे बुजवणे याचा थेट परिणाम शहराच्या पर्यावरणीय सुरक्षिततेवर होती.

पाणथळ क्षेत्राच्या नाशाबाबत गंभीर निरीक्षणे समोर

जानेवारी २०२५ मध्ये भाईंदर पश्चिम येथे कांदळवन क्षेत्रात राडा टाकून सुमारे १०० चौ. मी. क्षेत्राचे नुकसान केल्याप्रकरणी दोन रिअल इस्टेट कंपन्यांविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडा टाकल्याचेही आढळले होते. मिरा भाईंदरमध्ये यापूर्वी कांदळवन आणि पाणथळ क्षेत्राच्या नाशाबाबत गंभीर निरीक्षणेही समोर आली आहेत. २०१६ मध्ये राज्याच्या कांदळवन विभागाने भाईंदर पूर्वेकडे सुमारे १० हेक्टर पाणथळ क्षेत्रात भराव टाकून विकासकामे केल्याचे आणि कांदळवनांचे नुकसान झाल्याचे नमूद केले होते.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज

आवश्यक पर्यावरणीय परवानग्या नसताना विकासकामांना प्रशासकीय मान्यता देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, दोष आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, संशयास्पद किंवा अपूर्ण तपासाची प्रकरणे पुन्हा तपासावीत, कांदळवन वाचवण्यासाठी केवळ गुन्हे दाखल करून भागणार नाही; दोषींना शिक्षा होईपर्यंत तपासाचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू

Web Title: Vasai virar mangrove scam deforestation and environmental crimes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • scam
  • vasai
  • Vasai news
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
1

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष
2

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
3

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
4

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.