
मुंबई: मुंबईत (Mumbai) गेले काही दिवस थंडी होती. मात्र सध्या उकाडा वाढू लागली आहे. उकाडा वाढताच पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशावेळी मुंबई महापालिकेने (BMC Water Supply Update) पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात केली आहे. यामुळे मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात (Water Cut In Summer) पाणी कपातीच्या (Water Supply Cut In Mumbai) संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
[read_also content=”मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कडधान्याच्या पुरवठ्यासाठी १ कोटी ३० लाखांचे कंत्राट, महागाईतही बाजारभावापेक्षा कमी दर आकारल्याने वस्तूंच्या दर्जावर प्रश्नचिन्ह https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/bmc-issued-contract-of-1-crore-30-lakhs-for-sproute-purchasing-of-hospitals-nrsr-247572.html”]
गेल्या २८ फेब्रुवारीपासून, भातसा येथील विद्युत स्थानकात काही तांत्रिक दोष झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार आहे. पाणी कपात असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याचा योग्य असा साठा करून ठेवावा,असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून करण्यात आले आहे.