Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान; IMD चा अलर्ट काय?

राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 07, 2025 | 04:03 PM
Monsoon Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान; IMD चा अलर्ट काय?
Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. दरम्यान मुंबईला पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईला पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसाठी पुढील तीन तास अत्यंत महत्वाचे असणार आहेत. मुंबई आणि उपनगरात पुढील काही तास जोरदार पाऊस होऊ शकतो. पावसाचा जोरड वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबईसह आणि रायगड जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Raigad News : इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार ? भर पावसात गावकऱ्यांवर भितीचं सावट

रायगड जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हजेरी लावली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथे पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचण निर्माण झाली आहे.

अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका

ऐन उन्हाळ्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. 117 गावांतील 604 शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील 14 दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 238 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत.

इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार?

दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळली भर झोपेत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब उधवस्त झाली. या सगळ्याची पुनरावृत्ती आता कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे होताना दिसत आहे. इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलना दरम्यान पळसदरीमधल्या ठाकूरवाडी येथील 80 घरांचे स्थलांतरण करण्यात आले होते. या घटनेला दोन वर्ष उलटूनही अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही. ठाकूरवाडी येथील आदिवासी लोकांच्या वस्तीच्या मागे असलेले धोकादायक दगड हलवण्याबाबतस कोणतीही ठोस भूमिका अजूनही घेतलेली नाही.

Web Title: Weather department red alert to mumbai for next few hours raigad ratnagiti sindhuruga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Mumbai News
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
1

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी
2

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक
3

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
4

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.