Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या सोशल मीडिया, ओबीसी, एससी व अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांची कार्यशाळा 

राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत सात हजार नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे.

  • By विवेक
Updated On: May 30, 2026 | 07:49 PM
Workshop for Congress Social media, OBC, SC, Minority Cell in Mumbai, Congress, Harshvardhan Sakpal,

Workshop for Congress Social media, OBC, SC, Minority Cell in Mumbai, Congress, Harshvardhan Sakpal,

Follow Us
Follow Us:

राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत सात हजार नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाचे मुख्यालय दादरच्या टिळक भवनमध्ये दिनांक २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत ओबीसी, अल्पसंख्याक, एस.सी. व सोशल मीडिया विभागासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस गुरबिंदर बच्चर, अभिजित सपकाळ, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष हृषिकेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार आदी उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, निमिष साने, यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध R.J. संग्राम खोपडे यांनीही मार्गदर्शन केले.

Maharashtra Politics : महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा

हर्षवर्धन सकपाळ यांचा सरकारवर निशाणा

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “पुण्यात विषारी दारुने २२ जणांचा बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली असून हातभट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या काही रात्रीतून उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यात ५०० शहरे व ४३ हजार गावखेडी आहेत, या ठिकाणी अवैध धंदे व हातभट्या राजरोस सुरु आहेत. गुजरातचे महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारा सारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरु असून त्याला गृहविभागाचा आशिर्वाद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्यच बदलले आहे. पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रु वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात आहे” असे ते म्हणाले.

“…तर आमचा समाज पेटून उठेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार?

Web Title: Workshop for congress social media obc sc minority cell in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…
1

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने लढा थांबणार नाही, पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने लढा थांबणार नाही, पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

NEET/CBSE पेपरफुटीवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला राज्यभर कँडलमार्च व सत्याग्रह
3

NEET/CBSE पेपरफुटीवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला राज्यभर कँडलमार्च व सत्याग्रह

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल
4

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.