Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

जागतिक कांदळवन दिनानिमित्त भाईंदरमध्ये पर्यावरणप्रेमी आणि तरुणांनी एकत्र येत कांदळवन परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मात्र, या महत्त्वाच्या उपक्रमाला संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 12:49 PM
Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

Follow Us
Follow Us:
  • जागतिक कांदळवन दिनानिमित्त भाईंदरच्या जेसल पार्क परिसरात तरुणांनी स्वच्छता अभियान राबवत कांदळवन संवर्धनाचा संदेश दिला.
  • कार्यक्रमाला संबंधित शासकीय विभागांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
  • मीरा-भाईंदरमधील कांदळवनांची बेकायदा कत्तल आणि प्रलंबित प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली.
विजय काते :

भाईंदर: जागतिक मँग्रोव्ह (कांदळवन) दिनानिमित्त रविवारी भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क खाडीलगतच्या कांदळवन परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मीरा-भाईंदर शहरातील तरुण-तरुणी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू हटवत कांदळवन संवर्धनाचा संदेश दिला.

Mumbai Local: ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा; मालगाडीचे कपलिंग तुटले; मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत

जागतिक दिनी प्रशासनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या दिवशी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग, पर्यावरण विभाग तसेच संबंधित कांदळवन विभागाचा कोणताही प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणांना जागतिक कांदळवन दिनाचाच विसर पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कांदळवन संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

सहभागी तरुणांनी स्वच्छता अभियान राबविताना नागरिकांना कांदळवनांचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. किनारपट्टीचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पूरस्थितीपासून बचाव करण्यासाठी कांदळवने अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

मीरा-भाईंदरमधील कांदळवनांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

यावेळी काही समाजसेवकांनी मीरा-भाईंदरमधील कांदळवनांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण कोकण विभागात मीरा-भाईंदर हे असे शहर आहे, जिथे कांदळवनांची बेकायदा कत्तल आणि नासधूस केल्याप्रकरणी २०० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये पुढील तपास आणि कारवाई संथ गतीने होत असल्याने दोषींवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…

समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींनी केली ही मागणी

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी कांदळवन संरक्षणासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांसोबत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी मागणी समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींनी केली. जागतिक कांदळवन दिनानिमित्त तरुणाईने राबविलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा सकारात्मक संदेश संपूर्ण मीरा-भाईंदर शहराला मिळाला.

Web Title: World mangrove day cleanliness drive in bhayandar youth raise concern over government absence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.