Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल. तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होईल. चार सदस्य संख्येनुसार प्रभार रचना मंजूर असून प्रत्येक मतदाराला चार मते द्यावीच लागणार

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 07, 2026 | 03:04 PM
मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान
  • मतदारांमध्ये संभ्रमावस्था
  • सामन्यांचं मत नक्की कोणाला
महानगरपालिका निवडणुकीमुळे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी त्यांच्या निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानेही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. २२७ वॉर्डांसाठी २५१६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर २०१७ मध्ये २२७ नगरसेवकांपैकी ८४ नगरसेवक शिवसेनेचे, ८२ भारतीय जनता पक्षाचे आणि ३१ काँग्रेसचे होते. सर्व पक्षांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. याचदरम्यान नवी मुंबईत अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे निवडणूक पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुसदस्यीत पद्धतीन पार पडणार आहे.

नेमकी मतदान प्रक्रिया कशी?

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण २८ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ ते २७ मध्ये प्रत्येकी चार सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’) निवडले जातील. प्रभाग क्रमांक २८ मध्ये तीन सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’) निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग १ ते २७ मधील प्रत्येक मतदाराला चार वेळा मतदान करणे आवश्यक आहे. तसेच प्रभाग २८ मधील मतदारांना तीन वेळा मतदान करावे लागेल. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे एक मत द्यावचं लागणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका जागेसाठी एकापेक्षा जास्त मते देता येणार नाहीत. प्रत्येक उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर संबंधित लाल दिवा पेटेल. चारही (किंवा तीन) जागांसाठी मतदान पू्र्ण झाल्यानंतर बीप असा आवाज येईल, म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजणार.

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

चार सदस्यांच्या संख्येनुसार प्रभाग रचना मंजूर असून प्रत्येक मतदाराला चार मत द्यावीच लागणार आहेत. मग ते उमेदवार असो की नोटा. लोकशाहीचा अधिकार बजावण्यासाठी ईव्हीएम बटण चार वेळा दाबणे बंधनकारक आहे. त्याशिवाय मतदान केंद्रातून मतदारांना बाहेर पडता येणार नाही, अशी राज्य निवडणूक आयोगाची गाइडलाइन आहे. मतदान एकदा, दोनदा, तीन नव्हे तर चार वेळा करावे लागेल अशी स्पष्ट नियमावली आहे.

नोटा चा पर्याय

जर एखाद्या जागेसाठी कोणताही उमेदवार पसंत नसेल. तर त्या जागेच्या शेवटी ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय उपलब्ध असणार आहे. प्रभाग १ ते २७ मधील मतदारांनी एकूण ४ मते, तर प्रभाग २८ मधील मतदारांनी एकूण ३ मते देऊन लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.

सामन्यांचं मत नक्की कोणाला?

प्रभागानुसार चार वेळा मतदानाच्या प्रक्रियेत सर्वसामान्यांचं मत नक्की कोणाला जाणार? सध्याच्या बदलत्या आणि अनिश्चित राजकारणामुळे नेमकं कोणाला मतदान करावं, याबाबत अनेक मतदारांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं पहायला मिळत आहे. शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने मतदान होणार आहे. बहुतेक मतदारांना ही प्रक्रिया कशी असते? हे माहित नाही. मतदान केंद्रात गेल्यावर पहिले मत एका पक्षाच्या उमेदवाराला दिले. दुसरे मत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला दिले. तिसरे आणि चौथे मत अन्य कोणाला द्यायचे असेल तर काय करायचे. यावर मतदार प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. अनेक मतदारांना तर आपला प्रभाग क्रमांक कोणता हेच माहीत नाही. आपले मतदान केंद्र कुठे हे सुद्धा माहीत नाही.

मतदाराला चार मत द्यावीच लागणार

‘अ’ जागेसाठी १ मत

‘ब’ जागेसाठी १ मत

‘क’ जागेसाठी १ मत

आणि ‘ड’ जागेसाठी १ मत

वेगवेगळा रंग

‘अ’ जागेसाठी – पांढरा रंग

‘ब’ जागेसाठी – फिकट गुलाबी

‘क’ जागेसाठी – फिकट पिवळा

‘ड’ जागेसाठी – फिकट निळा

अंबरनाथमध्ये भाजप अन् कॉंग्रेसचे हातात हात! अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार, भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा

Web Title: Municipal elections 2026 voters will have to cast four votes be it candidate news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Maharashtra Local Body Election
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

नवी मुंबई दस्त नोंदणी घोटाळा: राज्यभर चौकशीचे आदेश, २० हजार कोटींचा घोटाळा उघड होणार?
1

नवी मुंबई दस्त नोंदणी घोटाळा: राज्यभर चौकशीचे आदेश, २० हजार कोटींचा घोटाळा उघड होणार?

Maharashtra MSME Council 2026 : नवी मुंबईत २७ जूनला रंगणार महाराष्ट्र एमएसएमई परिषद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती
2

Maharashtra MSME Council 2026 : नवी मुंबईत २७ जूनला रंगणार महाराष्ट्र एमएसएमई परिषद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक
3

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा
4

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.