अमरावतीमध्ये १९ माजी नगरसेवक मैदानात (फोटो- सोशल मीडिया)
निवडणुकीत पक्षांना बंडखोरीचा फटका
महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर
१९ माजी नगरसेवक मैदानात
अमरावती: तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर सज्जा इसला आहे. यंदाची निवडणूक केवळ सत्ताबदलापुरती मर्यादित नसून, अनुभव विरुद्ध बंडखोरी असा स्पष्ट संघर्ष पाहायला मिळणार आहे. अनुभवी, सलग विजय मिळवणारे १९ माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरले असतानाच, पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि नव्या चेहऱ्यांनी या निवडणुकीला ऐतिहासिक वळण दिले आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या ३३ वर्षाच्या इतिहासात सलग प्रत्येक निवडणूक जिंकत सभागृहात प्रवेश करणारे विलास इंगोले हे एकमेव नगरसेवक ठरले आहेत. अनेक टमांमध्ये नगरसेवक व महापौरपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या इंगोले यांचा अनुभव यंदाही काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ते जवाहरगेट-बुधवारा प्रभाग क्रमांक-१४ मधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. इतिहासाकडे पाहता, भाजपच्या कुसुम साहू व चेतन पवार यांनी प्रत्येकी पाच वेळा, तर पटीप बाजन यांनी समाचार केला विजय मिळवला आहे. प्रकाश बनसाड यानाहा तितक्याच वेळा सभागृह गाठले. बाळू भुयार, रतन डेंडुले, मिलींद बांबल, राधा कुरील, प्रमोद पांडे व सुनंदा खरड हे नगरसेवक दोन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत.
अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल
एअर अलायन्सची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून ४ दिवस सुरू असतानाच पुन्हा एकदा तिच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. सोमवारी मुंबईहून दुपारी १२.०५ वाजता अमरावतीसाठी रवाना होऊन दुपारी १.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता अमरावतीहून मुंबईकडे प्रस्थान करून सायंकाळी ४ वाजता मुंबईत दाखल होणार आहे. मात्र, बुधवार (दि. ७) पासून ही सेवा पुन्हा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात येणार आहे.
घनदाट धुक्याच्या समस्येमुळे १ ते १५ डिसेंबर या कालावधीत ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सेवा सुरू झाली असली तरी आठवड्यातून केवळ २ दिवसच उड्डाणे होत होती आणि वेळापत्रकातही बदल करण्यात आले होते. शुक्रवारपासून आठवड्यातून ४ दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली. एअर अलायन्सने २६ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकानुसार महत्त्वाचे बदल केले होते. त्यानुसार मुंबई-अमरावती विमान सकाळी ७.०५ वाजता रवाना होऊन ८.५० वाजता अमरावतीला पोहोचत होते, तर अमरावती-मुंबई विमान सकाळी ९.१५ वाजता उड्डाण घेऊन १०.३० वाजता मुंबईत दाखल होत होते.






