Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२० जागांवर मुस्लिम मतदार बिघडवणार खेळ; या मतदारसंघामध्ये १ कोटी मतदारांची भूमिका ठरणार निर्णायक

महाराष्ट्रात ११ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. तर १ कोटी ३० लाख मुस्लिम समाज आहे. त्यामुळे १२० जागा अशा आहेत जिथे मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका निभावू शकतात.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 12, 2024 | 04:00 PM
१२० उमेदवारांचं भवितव्य मुस्लिम मतदारांच्या हातात

१२० उमेदवारांचं भवितव्य मुस्लिम मतदारांच्या हातात

Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या ८ दिवसांवर आलं असून राज्यात प्रचारही शिगेला पोहोचला आहे. प्रचारादरम्यान नेत्यांनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने व्होट जिहादच्या केलेल्या आरोपांवर ओेवेसींनी पलटवार केला आहे. भाजपने मुस्लीम मतदान मिळवण्यासाठी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर ओवेसी यांनी याचा संबंध ब्रिटीशांशी जोडला आहे. दरम्यान राज्यातील किती जागांवर राजकीय पक्षांनी मुस्लिम उमदेवार दिले आहेत आणि मुस्लिम मतरांचा यंदाच्या निवडणुकीत किती परिणाम जाणवेल, पाहुया एक रिपोर्ट…

हेही वाचा –ठाकरेंच्या बॅगेची लातूरमध्ये पुन्हा तपासणी; सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; म्हणाल्या, “ठरवून पक्षप्रमुख…”

काही मतदारसंघांमध्ये ४० टक्के मुस्लिम मतदार

महाराष्ट्रात ११ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. राज्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर १ कोटी ३० लाख मुस्लीम समाज आहे. तर विधानसभेच्या १२० जागा अशा आहेत जिथे मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका निभावू शकतात. यातील ६० जागा अशा आहेत जिथे १५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. तर ३८ मतदारसंघात २० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार आहेत. विशेष म्हणजे ९ जागांवर ४० टक्के मतदार मुस्लीम आहेत.

विधानसभा निवडणुकीत केवळ १६ उमदेवार

मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकूण मुस्लीम उमेदवारांची संख्या केवळ १६ आहे. तर AIMIM ने १४ पैकी १० जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत. विधानसभेत AIMIM चे अद्याप १० टक्केही मुस्लीम आमदार नाहीत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. तर शिंदे गटाने १ अजित पवार गटाने ४, कॉंग्रेस ने ९ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने १ आणि समाजवादी पक्षाने २ मुस्लीम मतदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. विशेष म्हणेज विधासभा निवडणुकीत १५० जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नाही.

हेही वाचा-Maharashtra Assembly Election: 2004 मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

कोणाला  होणार मुस्लिम मतदारांचा फायदा

महाराष्ट्रात आजपर्यंत मुस्लिम मतदारांचा फायगा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला झाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यावेळी एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. त्यामुळे मुस्लिम मतदार नाराज असल्याची चर्चा असून याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यातच मुस्लिम मतदारांनी मतदानच करण्याचं टाळलं तर त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ओवीसी यांची खेळ बिघडवू शकते. अजित पवार याचे बहुतेक उमेदवार मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहेत.

Web Title: Muslim voter spoil game on 120 seats in maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप
1

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध
2

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध

Uran: रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजत महागाईचा निषेध, उरणमध्ये अनोखे आंदोलन
3

Uran: रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजत महागाईचा निषेध, उरणमध्ये अनोखे आंदोलन

Mahayuti internal disputes: महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा
4

Mahayuti internal disputes: महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.