उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी (फोटो-ट्विटर)
लातूर: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका प्रचार सभेला जात असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली आहे. औसा हेलीपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील औसा हेलीपॅडवर ठाकरेंच्या बॅग तपासण्यात आल्या आहेत. काल वणी येथे देखील त्यांची बॅग तपासण्यात आली होती.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
निवडणूक आयोगाने घातलेल्या आचारसंहितेचा आदर केला पाहिजे. मात्र ही आचारसंहिता केवळ आमच्यासाठी आहे की, सत्ताधारी यांच्यासाठी आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. हे जे काही चालू आहे त्यावरून ठरवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. त्यांची प्रतिमाहनन करण्यासाठी या प्रकारचे कृत्य केला जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचासाठी आज उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. दरम्यान वणी येथे प्रचारसभेसाठी जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या बगची झडती घेतली. त्यामुळे संतापलेल्या ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आणि नंतर प्रचारसभेतही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी याचा स्वत: व्हिडिओही शूट केला आहे.
गेल्या चार महिन्यात फक्त बॅग तपासण्यासाठी मीच सापडलो का? नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा का तपासल्या नाहीत आजपर्यंत? असा सवाला उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला. मी तुमच्या कामात अडथळा आणणार नाही, मात्र सर्व पक्षांच्या नेत्यांची झडती घ्या. पण या निवडणुकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्याचे व्हिडिओ समोर आले पाहिजेत, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वणी झालेल्या प्रचार सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून चांगलाच समाचार घेतला. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेसाठी आल्यावर सर्व रस्ते बंद केले जातात. पण मोदी असो वा अमित शाह, फडणवीस असोत वा अजित पवार यांच्या बॅगा कधी तपासल्या का? त्या तपासल्या जाणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता त्यांच्या बॅगा तपासतील. पण पोलिसांनी मधे यायचं नाही. निव़डणूक अधिकाऱ्यांनीही मधे यायच नाही, आमच्या बॅग तपासण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच प्रचाराला जो कोणी येईन, त्याची बॅग तपासण्याचा अधिकारही मतदारांना आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हटलं आहे.