Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिवांना दिले पत्र… मात्र या पत्रावर अजित पवारांची सहीच नाही

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांकडे दिलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 30, 2022 | 08:53 AM
विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिवांना दिले पत्र… मात्र या पत्रावर अजित पवारांची सहीच नाही
Follow Us
Follow Us:

नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज सूप वाजणार आहे. या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले. सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे इत्यादी अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येत सूडाचे व कुरघोडीचे राजकारण केल्याचे पाहिले. विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक असून, दररोज आंदोलन करताहेत, अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होत, आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी मंत्री राजीनामा तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तसेच नवीन बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे.

[read_also content=”आज सूप वाजणार! अधिवेशनात दिवसभरात काय-काय घडामोडी घडणार? शेवटच्या दिवशी कोण बॉम्ब फोडणार? वाचा सविस्तर… https://www.navarashtra.com/maharashtra/what-will-happen-during-the-day-in-winter-assembly-session-today-who-will-explode-the-bomb-on-the-last-day-read-more-357963.html”]

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांकडे दिलं आहे.  मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने नार्वेकरांविरोधात हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे.

अजित पवारांची स्वाक्षरी नाही

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी या पत्रावर असायला हवी होती, मात्र या पत्रावर स्वाक्षरी का नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. मविआने जर प्रस्ताव दिला असला तरी भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असल्याने हा प्रस्ताव नामंजूर होण्याचीच शक्यता अधिक आहे. तर विधानसभा सचिव या प्रस्तावावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Mva against assembly speaker letter given to assembly secretary but ajit pawar does not have signature on this letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 08:53 AM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
1

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
3

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
4

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.