Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश

महायुतीला मोठा फायदा झाला. भाजपने २८८ पैकी २३६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. भाजपचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 21, 2025 | 02:55 PM
Ravindra Chavan Press Conference

Ravindra Chavan Press Conference

Follow Us
Close
Follow Us:
  • २ डिसेंबर आणि २० डिसेबंरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यंनी या निवडणुकीत मोलाचे योगदान
  • भाजपने २८८ पैकी २३६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवडणूक
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025 LIVE Updates: आज राज्यभरात २ डिसेंबर आणि २० डिसेबंरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल लागला. संपूर्ण राज्यात निकाल घोषित व्हायला थोडासा अवधी आहे. निकालांचे कल आणि आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार २८८ जागांच्या या निवडणुकीत महायुतील जवळपास २२५ ठिकाणी यश मिळालं आहे. त्यात स्थानिक आघाड्यांचे २०-२५ पेक्षा जास्त आहे. महायुतीला दिलेला कौल त्यासाठी आभार मानावेत ते कमी आहेत. मतदारांचे आभार मानन्यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहे. असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी जनतेचे आभार मानले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यंनी या निवडणुकीत मोलाचे योगदान होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात या निवडणुका पार पडल्या. मुख्यमंत्री म्हणून राज्यभरात ५० हून अधिक सभा घेतल्या. काही सभांना त्यांना जाता आले नाही. कार्यकर्ता म्हणून देवेंद्रजींनी सर्व ठिकाणी सभा घेतल्या.

Maharashtra Local Body Election Result 2025 Live: राज्यातील 288 नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?

महायुतीला मोठा फायदा झाला. भाजपने २८८ पैकी २३६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. भाजपचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला वेळ, कार्यर्त्यांबरोबर त्यांनी प्रत्यक्षात जाऊन लढली. भाजपला विधासभा निवडणुकीतही जनतेने घवघवीत यश दिले. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीही विरोधक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी आणि जनतेने दुर्लक्ष केलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या ताकदीने काम करत आहे. या सगळ्याचा फायदा नागरिकांना जास्तीत जास्त कसा होईल. यासाठी महायुतीचे नेते परिश्रम घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने रोडमॅप तयार केला आहे.

नागपूरमध्ये भाजपला घवघवीत यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १२ नगरपंचायतींचे निकाल रविवारी जाहीर झाले. १५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. उर्वरित तीनपैकी एका ठिकाणी काँग्रेस, एका ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, तर एका ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) यांना यश मिळाले. या निकालांमुळे जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. मात्र बहुतांश ठिकाणी खरी चुरस भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होती. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत झाली, तर काही नगरपालिकांमध्ये भाजपला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागला.

भाजपने सुरुवातीपासूनच ‘एकला चलो’ची भूमिका घेत संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यावर भर दिला होता. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल भाजपच्या याच रणनीतीला पूरक ठरले आहेत.

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालां

नागपूरमध्ये कशी झाली निवडणूक?

१५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असून त्यामध्ये कामठी, सावनेर, उमरेड, खापा, वाडी, कळमेश्वर आदी नगरपालिकांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काटोल नगरपालिकेत अध्यक्षपद जिंकले, तर शिवसेनेने रामटेकचा गड कायम राखला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेत भाजपला प्रथमच यश मिळाले आहे.

 

 

Web Title: Nagar parishad nagar panchayat election result 2025 the oppositions narrative failed bjp mahayuti achieves resounding success in the municipal council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Election Result
  • Maharashtra Politics
  • nagar panchayat elections
  • nagar parishad

संबंधित बातम्या

कराडमध्ये यशवंत विचारांचा विजय; आता विकासाची वाटचाल…; निकालानंतर बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रीया
1

कराडमध्ये यशवंत विचारांचा विजय; आता विकासाची वाटचाल…; निकालानंतर बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रीया

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात
2

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात

सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?
3

सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
4

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.