Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रचारतोफा थंडावल्या; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उद्या मतदान

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील ९ गटांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले असून, पण पंचायत समितीच्या १८ जणांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या शिवना गटात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये सरळ सामना होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 08:30 AM
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

Follow Us
Follow Us:

मुंबई : मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीचा प्रचार गुरुवारी रात्री थंडावला. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. सिल्लोड तालुक्यातील २ लाख ४८ हजार ८७४ मतदार मतदान करतील. यासाठी तालुक्यातील ३०५ मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी १४०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. निलेश अपार हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तहसीलदार संजय देवराये, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, नगरपरिषद मुख्याधिकारी कारभारी दिवेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

पंचायत समितीच्या हळदा, अंभई, केळगाव व बोरगाव सारवानी या चार गणात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सरळ लढत होत आहे. उंडणगाव, भराडी, हट्टी, आमठाणा, धानोरा, अंधारी या सहा पंचायत समिती गणांमध्ये तिरंगी लढत होत आहे. पंधरा दिवसाच्या रणधुमाळीनंतर शनिवारी रात्री निवडणूक प्रचार थंडावला.

आता मतदानाकडे लागले लक्ष…

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने तालुका स्तरावरील पंचायत समितीसारखी ग्रामीण यंत्रणा राबवणारे स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय द्वंद बघावयास मिळाले. त्यामुळे आता मतदानाकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ३९ जण रिंगणात

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील ९ गटांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले असून, पण पंचायत समितीच्या १८ जणांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या शिवना गटात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये सरळ सामना होत असून, अंधारी जिल्हा परिषद गटात शिवसेना (शिंदे गट) भाजप व शिवसेना (उबाठा) यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव

Web Title: Voting for zilla parishad and panchayat samiti will be held tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Local Body Elections
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
1

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
2

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
3

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
4

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.