Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

अजित पवाराच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले असले, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, याचा फैसला अखेर निकालाच्या दिवशीच होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 06, 2026 | 10:50 AM
Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात विकासकामांपेक्षा ‘भावनिक आवाहनांना’ अधिक प्राधान्य
  • राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून “राष्ट्रवादीला दिलेले एक मत म्हणजे अजितदादांना खरी श्रद्धांजली- राष्ट्रवादीकडून आवाहन
  • सभा, गावभेटी आणि सोशल मीडियावरील प्रचार साहित्यात आता दादांच्या प्रशासकीय निर्णयांच्या माहितीपेक्षा त्यांच्या आठवणी
Pune ZP Election 2026: “मी कामाचा माणूस आहे, माझ्या कामाच्या जोरावर मत मागतो, ” हे वाक्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची ठळक ओळख ठरले होते. विकासकामे, प्रशासकीय पकड़, निर्णयक्षमता आणि ठोस कार्यपद्धती याच्या बळावर मतदारांसमोर उभे राहणे हीच त्यांची कायमची भूमिका होती. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय प्रचाराचे स्वरूप बदलत असल्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून विकासकामपिक्षा भावनिक आवाहनांवर अधिक भर दिला जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. “राष्ट्रवादीला एक मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली,” असा भावनिक संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहे. प्रचार साहित्य, गावभेटी, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या संवादात हा सूर ठळकपणे उमटताना दिसत आहे.

PCMC Property Tax: पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल

एकत्र ठेवण्याचे आव्हान

विरोधी पक्षांकडूनही या बदललेल्या प्रचारशैलीवर सूचक टीका होत असून, कामाचा वारसा सांगणाऱ्यांनी कामाचे तपशील मांडावेत, अशी अप्रत्यक्ष मागणी पुढे येत आहे. एकूणच, अजित पवाराच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले असले, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, याचा फैसला अखेर निकालाच्या दिवशीच होणार आहे. ग्रामीण भागात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

मात्र, ही प्रचाराची पद्धत खुद्द अजित पवार यांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधात जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे, भावनिक लाटांवर स्वार होण्याऐवजी विकासकामांची मांडणी, आकडेवारी, निर्णयांची स्पष्टता आणि कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या नावावर भावनिक मतदान मागणे हे त्यांच्या राजकीय संस्काराशी विसंगत असल्याची भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे, पुणे जिल्हा हा नेहमीच मुद्देसूद, विचारपूर्वक आणि तुलनात्मक मतदानासाठी ओळखला जातो.

सिंचन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या मुद्दधांवर आधारित राजकारण येथे प्रभावी ठरले आहे, अशा परिस्थितीत भावनिक आवाहनांवर आधारित प्रचार कितफ्त परिणामकारक ठरेल, याबाबत राजकीय विश्लेषक साशंकता व्यक्त करत आहेत.

 

Web Title: From focusing on work performance to emotional appeals the focus of campaigning has shifted in the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.