
वाई : वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मदन पिसाळ यांनी सातत्याने पाठपुरावा करून स्वप्नातील नागेवाडी धरण बांधले यापूर्वी नागेवाडी व दरेवाडी या डोंगराला भागातील गावांना उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा होत होता, परिसरातील काही गावात उन्हाळ्यात पाण्याचा बिकट प्रसंग होता. डोंगराळ जिरायत शेती पाण्याखाली नव्हती म्हणूनच मदन पिसाळ यांनी संकल्प केला होता.
नागेवाडी धरण उभारणीचा, नागेवाडी धरणाखाली जलस्वराज्य योजनेतून बावधन, दरेवाडी नागेवाडी व कणूर या चार गावामध्ये विहिरी काढून पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावला होता. शेतीसाठी कणूर, बावधन, अनपटवाडी, दरेवाडी, नागेवाडी, महातेकरवाडी, पांढरेचीवाडी, वाघजाईवाडी, शेलारवाडी, व्याजवाडी, मालुसरेवाडी, घेरेचीवाडी,कडेगाव, व्याहाळी, या गावांचे शेत शिवार ओलिताखाली आले. धरणामुळे जवळच्या गावांची विहिरींच्या पाण्याची पाणी पातळी वाढली, त्यामुळे कणूर गाव पूर्ण बागायती झाले गावाचा भरभराट झाला.
नागेवाडी धरण कणूर व नागेवाडी गावच्या डोंगर खोऱ्यात द्रोणा कार भागात असून हिरव्यागार डोंगर झाडी थंडगार हवा यामुळे सृष्टी निसर्ग खुलून दिसतो. या परिसरात बावधन वाई पाचगणी परिसरात येणारे पर्यटन धरण परिसरात फेरफटका मारतात. धरणाहून पाचगणी घाटात जाणारा चांगला रस्ता असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पावसाळ्यात धरण भरल्याने धरणाचे चित्र विलोभनीय दिसत आहे. बावधन व वाई परिसरातील भरती प्रशिक्षण विद्यार्थी रनिंग, व्यायामासाठी धरणाच्या भिंतीवर कसून सराव करत असतात. थंडगार व प्रसन्न वातावरणामुळे पर्यटकांना नागेवाडी धरण आकर्षित करते.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या नागेवाडी परिसर विकसित होताना दिसत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने इथल्या सुविधा विकसित केल्या तर पाचगणी महाबळेश्वर सारखेच घटकांच्या आवडती ठिकाण म्हणून नावारूपाला येईल त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होण्याची अत्यंत गरज आहे, अशा अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते दिलीप कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
चित्रपट सृष्टीला सुद्धा भुरळ……
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नागेवाडी परिसर आहे. चोहोबाजूने सह्याद्रीच्या रांगा, हिरवागार परिसर आणि समोर विस्तीर्ण नागेवाडी जलाशय, केवळ पर्यटकांनाच नव्हे तर चित्रपटसृष्टीलाही आकर्षित करीत असतो. एक हिंदी मराठी चित्रपटाची चित्रीकरण या परिसरात वर्षभर होत असते. हिंदी मराठी मालिका ठिकाणी नेहमी पाहायला मिळते. सलमान खान, अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे