Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरचा आता चांगला विकास होणार; महानगरपालिकेसाठी 315 कोटींचा निधी मंजूर

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या कामांसाठी स्वतंत्र आराखडे तयार केले असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2025 | 08:01 AM
नागपूरचा आता चांगला विकास होणार; महानगरपालिकेसाठी 315 कोटींची मंजूर

नागपूरचा आता चांगला विकास होणार; महानगरपालिकेसाठी 315 कोटींची मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महानगरपालिकेसाठी तब्बल ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, उद्याने आणि प्रकाश व्यवस्थेच्या विकासकामांना वेग येणार आहे. नगरविकास विभागाच्या शासन आदेशानुसार या निधीची तरतूद अधिसूचित नागरी सुविधा उभारणीसाठी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील विविध सुविधांबाबत सविस्तर विकास आराखडा शासनाकडे पाठविला होता. यास मंजुरी देत राज्य सरकारने निधी वाटपाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, मंजूर निधीतून प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण, जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइनचे बदल, नव्या ड्रेनेज लाईन्स टाकणे, तसेच उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित करणे यासारखी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येतील. याशिवाय स्मार्ट लाइटिंग प्रकल्प, स्वच्छता केंद्रे, सार्वजनिक शौचालये, आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणा सुधारणा या प्रकल्पांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या कामांसाठी स्वतंत्र आराखडे तयार केले असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी तांत्रिक तपासणी पथक स्थापन करण्याचे नियोजन आहे.

चौकांची पुनर्रचना, पाणीपुरवठा होणार सक्षम

विशेषतः पर्व आणि उत्तर नागपूरसह इतर भागातील मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा समस्या प्राधान्याने सोडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पश्चिम नागपूरमधील वाहतुकीतील अडचणी दूर करण्यासाठी काही प्रमुख चौकांचे पुनर्रचना आराखडेही तयार केले गेले आहेत. राज्य सरकारने नागपूरला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांशी हा निर्णय सुसंगत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागपूरच्या नागरी विकास कामांना गती मिळून प्रलंबित आणि अत्यावश्यक नागरी सुविधा प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे.

बावनकुळे यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

येत्या काही महिन्यांत रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सोयी-सुविधांमध्ये ठोस सुधारणा दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकासमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Nagpur will now have good development rs 315 crores approved for the municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • Development Work
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Bachchu Kadu in Nagpur: न्यायालयाने दणका देताच प्रहार संघटनेचे बच्चू कडू नरमले; रेल्वे रोको मागे घेण्याचा निर्णय
1

Bachchu Kadu in Nagpur: न्यायालयाने दणका देताच प्रहार संघटनेचे बच्चू कडू नरमले; रेल्वे रोको मागे घेण्याचा निर्णय

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
2

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडूंनी फोडला फडणवीस सरकारला घाम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केले नागपूर जाम
3

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडूंनी फोडला फडणवीस सरकारला घाम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केले नागपूर जाम

लग्नाच्या आमिषाने वृद्धाला 28 वर्षीय तरुणीने फसवले; वेळोवेळी केली पैशांची मागणी, तब्बल 11.47 लाख हडपले
4

लग्नाच्या आमिषाने वृद्धाला 28 वर्षीय तरुणीने फसवले; वेळोवेळी केली पैशांची मागणी, तब्बल 11.47 लाख हडपले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.