Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Nagpur News: नागपुरात वंजारी, कोहळे, सोले आणि कराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपची नियोजित रॅली मात्र रद्द करण्यात आली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 02:41 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • निवडणुकीत जागा दाखवू -वंजारी
  • देशमुखांच्या घरातून वंजारीची रॅली
  • भाजपाची रॅली रद्द
  • सोले सेनाड कराळे
Nagpur News:विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे, भाजप बंडखोरद्वय अनिल सोले व अॅड. रमण सेनाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर कराळे यांच्यासह अन्य काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

विभागीय आयुक्त कार्यालय परिसराला राजकीय कार्यक्रमासारखे स्वरूप आले होते. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरण्याचे जाहीर केल्याने प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले.

निवडणुकीत जागा दाखवू -वंजारी

अनिल सोले यांनी अर्ज दाखल केला असला तरी शेवटी पक्ष हितासाठी ते माघार घेतील, अशी अपेक्षा भाजप उमेदवार माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केली. सोले माझे राजकीय गुरू असून पक्ष नेतृत्वासह सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

देशमुखांच्या घरातून वंजारीची रॅली

काँग्रेस महाविकास आघाडीचे अभिजीत दंजारी यांच्या नामांकनाची रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते अनिल देशमुख यांच्या जीपीओ परिसरातील निवासस्थानातून काढण्यात आली. या रॅलीतून काँग्रेसने एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री रणजित कांबळे

आमदार संजय मेश्राम, माजी आमदार अशोक धवड, अतुल लोंढे, अतुल कोटेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक रॅलीत सहभागी झाले होते. वंजारी यांनी दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर जवाहर विद्यार्थीगृह येथे त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

भाजपाची रॅली रद्द

सुधाकर कोहळे यांच्या नामांकनासाठी पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली. सिव्हिल लाईन्समधील स्वागत लॉनपासून रॅली काढण्यात येणार होती. मात्र, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने अर्ज भरण्याची सूचना केली. बावनकुळे यांच्यासह राज्यमंत्रीद्वय आशिष जयस्वाल, पंकज भोयर, प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, विष्णु चागदे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र आले होते.

सोले सेनाड कराळे

भाजपचे बंडखोरद्वय अनिल सोले व अॅड. रमण सेनाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) बंडखोर नितेश कराळे १०-१५ मिनिटांच्या फरकारने अर्ज भरण्यासाठी आले. सोले यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सेनाड यांच्यासोबतही बऱ्यापैकी समर्थक होते. कराळे यांनी संविधान चौकातून रॅली काढली. पगडी घालून आले होते. महात्मा गांधीच्या वेशभूषेतील कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्त्याही त्यांच्यासोबत होत्या.

 

Web Title: Nagpur news four candidates file nominations show of strength but bjp rally cancelledcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • BJP
  • Marathi News
  • Nagpur Election 2026
  • Nagpur News
  • Nagpur Politics

संबंधित बातम्या

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार
1

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
2

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
3

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
4

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.