Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

Nagpur News : ७०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान २४ तास CCTV निगराणी, नियंत्रण कक्ष, स्वच्छता, पाणी, वीज, शौचालये, निवास आणि आरोग्य सुविधांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 07, 2026 | 03:57 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • २४ तास CCTVचा वॉच; नियंत्रण कक्षही उभारणार
  • डोम, निवास आणि आरोग्य सुविधांवर भर
  • अंबाझरी तलावात सुरक्षा आणि सुविधा
Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. त्यामुळे या काळात सुरक्षा, गर्दी नियंत्रण, पाणी, स्वच्छता, आरोग्य, निवास आणि वाहतूक ही प्रशासनासमोरील मोठी आव्हाने असतात.

यंदाच्या ७०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने तयारीला वेग दिला आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेत विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

२४ तास CCTVचा वॉच; नियंत्रण कक्षही उभारणार

दीक्षाभूमी परिसराभोवती २४ तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी मनपाकडून नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष कर्मचारी तैनात केले जातील. वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, शौचालये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

डोम, निवास आणि आरोग्य सुविधांवर भर

दीक्षाभूमी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर, माता कचेरी आणि कुर्वेज शाळा परिसरात अनुयायांसाठी मोठे डोम उभारण्यात येणार आहेत. बेझनबाग आणि उंटखाना मैदानावर निवास व शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विविध ठिकाणी तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारून अनुयायांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

अंबाझरी तलावात सुरक्षा आणि सुविधा

अंबाझरी तलावात अनुयायांच्या स्नानाच्या वेळी सुरक्षितता राखण्यासाठी अग्निशमन दल आणि बोटी तैनात केल्या जातील. नागरिकांना तलावाच्या पाण्यात उतरण्यापासून रोखण्यासाठी आणि सोयीसाठी, तलावाजवळ तात्पुरती शौचालये (कपडे बदलण्याची खोली/शौचालये) बांधली जातील.

Web Title: Nagpur news 24 hour cctv surveillance at deekshabhoomi municipal commissioner accelerates preparations for dhammachakra pravartan dincp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation

संबंधित बातम्या

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
1

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
2

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
3

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
4

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.