Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

नराधम वडिलाचा काही वेळातच मृत्यू झाला. तेवढ्यात आई घरी आली. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसीचे ठाणेदार बाबुराव राऊत लगेच पथकासह घटनास्थळी पोहचले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 01:03 PM
दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्...

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्...

Follow Us
Follow Us:
  • पोटच्या अल्पवयीन मुलीवरच बळजबरी
  • घरात कोणीही नसल्याची संधी साधली
  • मुलीने स्वत:च पोलिसांत केला फोन; पत्नीने दिली तक्रार
नागपूर : नराधम बापाने दारूच्या नशेत पोटच्या अल्पवयीन मुलीवरच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी मुलीने घरात ठेवलेली बॅट उचलून बापावर हल्ला केला. डोक्यावर प्रहार झाल्याने बाप रक्तबंबाळ होऊन कोसळला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. खेसारीलाल (बदललेले नाव) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी मृताची पत्नी दीपा (वय ३८) यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय खेसारीलाल हा पत्नी, १७ वर्षीय मुलगी आणि मुलासह राहत होता. मुलगी ही बाराव्या वर्गात तर मुलगा आठव्या वर्गात शिकतो. तो मोलमजुरीचे काम करायचा. दारूच्या आहारी गेल्यामुळे तो नियमित कामावर जात नव्हता. यामुळे पत्नी दीपा लोकांच्या घरी धुणी-भांडी करून कुटुंबाचा गाढा ओढत होती. खेसारीलालची मुलीवरच वाईट नजर होती. घरात कोणी नसताना तो तिच्याशी अश्लील चाळे करत होता. विरोध केल्यास शिवीगाळ करून मारहाण करत होता.

मुलगीने याबाबत आईलाही सांगितले होते. सोमवारी रात्री ८ वाजता खेसारीलाल दारूच्या नशेत घरी आला. पत्नी कामानिमित्त घराबाहेर होती तर मुलगा खेळायला गेला होता. त्यामुळे घरात खेसारीलाल आणि मुलगी हे दोघेच होते. खेसारीलालने मुलीशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर वाद वाढला. खेसारीलालने तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीने शेजारीच पडलेली बॅट उचलून बापाच्या डोक्यात प्रहार केले. खेसारीलाल गंभीर जखमी होऊन कोसळला.

मुलीने स्वतःच केला पोलिसांना फोन

नराधम वडिलाचा काही वेळातच मृत्यू झाला. तेवढ्यात आई घरी आली. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसीचे ठाणेदार बाबुराव राऊत लगेच पथकासह घटनास्थळी पोहचले. खेसारीलालला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पंचनामा केल्यानंतर मृताची पत्नी दीपा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्याबाबतची पुढील कायदेशीर कार्यवाही बाल न्यायव्यवस्थेतील तरतुदींनुसार केली जात आहे.

मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

Web Title: Father attempts to force himself on daughter while intoxicated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
2

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
3

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
4

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.